Showing posts with label Mahaaraashtra Times. Show all posts
Showing posts with label Mahaaraashtra Times. Show all posts

Monday, October 29, 2007

पुणेकरांची श्रद्धास्थाने

मानाचा पहिला गणपती : कसबा गणपती
पुण्याची ग्रामदैवत म्हणून कसबा गणपतीला पहिला मान देण्यात आला आहे. पुण्यात कसबा गणपतीच्या प्रतिष्ठापनेपासूनच सार्वजनिक गणेशात्सवाला सुरूवात होते.

मानाचा दुसरा गणपती : तांबडी जोगेश्वरी

मानाचा तिसरा गणपती : गुरुजी तालीम

भाऊ रंगारी यांचा गणपती

वैद्य भाऊसाहेब रंगारी यांच्या गणपतीला खऱ्या अर्थाने पहिला सार्वजनिक गणपती म्हणावे लागेल . कृष्णाजीपंत खासगीवाले यांनी ग्वाल्हेर भेटीत तेथील सार्वजनिक गणेशोत्सव पाहिला . त्याने प्रेरित झालेल्या खासगीवाले यांना पुण्यातही असा उत्सव सुरू व्हावा , असे वाटले . त्यासाठी त्यांनी लोकमान्य टिळकांची भेट घेतली . शालूकर बोळात रंगारी यांच्या निवासस्थानी या सार्वजनिक गणेशोत्सवाचा पहिली मुहुर्तमेढ रोवली गेली . स्वातंत्र्याच्या चळवळीस वेग येण्यासाठी , तसेच प्रबोधनाचे व्यासपीठ म्हणून १८९२ मध्ये भाऊ रंगारी यांच्या गणपतीपासून सात दिवसांचा गणेशोत्सव सुरू केला . १९९३ पासून तो दहा दिवसांचा झाला .

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती

याला कोतवाल चावडी गणपती किंवा बाहुलीचा हौद गणपती असे नाव होते . श्रीमंत दगडुशेठ हलवाई यांनी १८९३मध्ये स्वखर्चाने ही मूतीर् बसविली होती . तेव्हापासूनच नवसाला पावणारा देव अशी या गणरायाची ख्याती आहे . १९६७ मध्ये नवी मूतीर् बसवण्यात आली . कर्नाटकातील मूतिर्कार शंकरअप्पा आणि त्यांचे चिरंजीव नागेश शिल्पी यांनी ती तयार केली होती . या मूतीर्ला यंदा ४० वषेर् पूर्ण होत आहेत . दगडुशेठ गणपतीच्या दर्शनासाठी पुणे आणि राज्यातूनच नव्हे ; तर संपूर्ण देशातून भाविक येतात . या ट्रस्टचा वाषिर्क जमाखार्च सहा कोटी रुपयांच्या घरात जातो .

अखिल मंडई मंडळ गणपती

मंडई हे पुण्याचे मध्यवतीर् ठिकाण . हा गणपती म्हणजे मंडईत येणाऱ्या अठरापगड जातींच्या पुणेकरांच्या एकीचे प्रतीक मानले जाते . या मंडईतील गणपतीची स्थापनाही १८९३ सालीच झाली . लोकमान्य टिळकांची या मंडळासमोर गणेशोत्सवात अनेकदा व्याख्याने झाली . श्री शारदा आणि गजाननाची मूतीर् असलेला हा गणपती मानाच्या पाच गणपतींमध्ये नसला तरी सामान्य पुणेकरांच्या दृष्टीने त्याला महत्त्वाचे स्थान आहे .

विंचुरकर वाडा गणपती

लोकमान्य टिळकांनी ' केसरी ' संस्थेचा गणपती ते राहात असलेल्या विंचुरकर वाड्यात सुरू केला . कायदा विषयावर क्लासेस घेणाऱ्या टिळकांच्या या गणपतीला तेव्हा ' लॉ क्लासचा गणपती ' असेच नाव पडले होते . वाड्यातील पटांगणात मंडप टाकून त्यात हा उत्सव साजरा होऊ लागला .

रूप गणेशाचे

।। रूप ॐकार साकाराचे ।।

तू तो ॐकार साकार अखिल विश्वाचा आधार।
मूलतत्त्व निराकार तो ही तूचिं गणेशा ।।

श्री गणरायाचं हे सार्थ वर्णन.. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि , असा ज्याचा उल्लेख केला गेलाय , म्हणजेच ज्यानं अवघं विश्व व्यापून टाकलंय असा हा श्रीगणेश.. पण तरीही हा गणपतीबाप्पा आपल्याला आपल्यातलाच एक वाटतो.. त्याचं साजिरं रूप तर आपल्याला भलतंच भावतं.. वक्रतुंड , महाकाय , शूर्पकर्ण , गजानन , एकदंत , लंबोदर , अशी अनेक नावं या गणेशानं धारण केली आहेत. पण त्याचं हे रूप प्रतिकात्मक आहे , ती आहे प्रतिकांची देवता.. नेता आणि तत्त्ववेत्त्याचे गुण तो आपल्या रुपातून सांगतो , ते असेः
श्री गणपतीचं शीर हत्तीचं कसं , याबद्दलची पौराणिक कथा आपण सारेच जाणतो. अजाणतेपणी गणपतीचं शीर भगवान शंकराने कापून टाकले आणि नंतर पार्वतीला संतुष्ट करण्यासाठी त्यांनी पार्षदाला शीर शोधून आणण्यास पाठविले. तेव्हा तो हत्तीचं मस्तक घेऊन आला आणि ते गणेशाच्या धडावर ठेवण्यात आले आणि गणपती झाला गजानन. ही कथा भावगर्भित आहे. भगवान शंकर जर आपल्या मुलाला हत्तीचे मस्तक बसवू शकतो तर गणेशाचे स्वतःचेच मस्तक का नाही , हा प्रश्न स्वाभाविकच प्रत्येकाच्या मनात येतो. पण , पुराणकथा इतक्या साध्या नसतात. या कथेचा गर्भितार्थ असा की , गणपती ही तत्त्वज्ञानाची देवता आणि समाजाचा नेता आहे. तत्त्ववेत्ता आणि नेता यांच्याजवळ हत्तीचेच मस्तक असले पाहिजे. संकुचित वृत्तीचा माणूस महान तत्त्ववेत्ता किंवा लोकप्रिय नेता बनू शकत नाही.
गण-पती म्हणजेच समूहाचा पती , अर्थात नेता. तो गुण-पतीही आहे. नेता आणि तत्त्ववेत्त्याकडे बाह्य सौंदर्य नसले तरी आंतरिक सौंदर्याचे अमाप वैभव असले पाहिजे , हेही श्रीगणेशाच्या रुपातून प्रतीत होते. तसेच , हत्ती हा सर्व प्राण्यांमध्ये हुशार मानला जातो आणि नेता निर्बुद्ध असून कसे चालेल , म्हणून गणपती गजानन.
या गजाननाचे कान सुपासारखे कशासाठी , तर नेत्याने सर्वांचे बोलणे ऐकून घ्यावे. पण त्यातले सार ग्रहण करून तत्त्व नसलेल्या गोष्टी बाजूला ठेवाव्यात , हे मार्गदर्शन त्यात आहे. हे मोठे कान उत्तम श्रवणभक्तीचेही दिग्दर्शन आहे
गणपतीचे हत्तीसारखे बारीक डोळे , आयुष्यात सूक्ष्म-दृष्टी ठेवण्याची प्रेरणा देतात , तसेच ते दूरदृष्टीदेखील सुचवितात. हत्ती व्यक्तीचे भविष्य वाचू शकतो , असेही आपल्याकडे मानले जाते. म्हणूनच , जुन्या काळात कुण्या बेवारस राजाचे निधन झाले तर हत्तीणीच्या सोंडेत माळ देत व ती ज्याच्या गळ्यात माळ घालेल त्याला राजा बनवत असत. हत्तीचे लांब नाक अर्थात सोंडही त्याचेच प्रतीक आहे. भविष्यात घडणा-या गोष्टींचा गंध नेत्याला प्रथम आला पाहिजे , असे ही सोंड सुचवते.
श्री गणेशाचे दोन सुळे.. एक पूर्ण आणि दुसरा अर्धा. त्यातला पूर्ण सुळा श्रद्धेचा आणि अर्धा बुद्धीचा आहे. त्याचा अर्थ असा की , जीवन विकासासाठी स्वतःवर आणि देवावर पूर्ण विश्वास असला पाहिजे. भले विद्वत्ता काहीशी कमी असेल तरी चालेल !
गणपतीच्या चार हातांपैकी एका हातात अंकुश , दुस-या हातात पाश , तिस-या हातात मोदक आहे आणि चौथ्या हाताने तो आशीर्वाद देतोय. त्यापैकी अंकुश वासना-विकारांवर संयमाची गरज असल्याचे सुचवितो , तर गरज पडताच इंद्रीयांना किंवा अनुयायांना शिक्षा करण्याचे सामर्थ्यही तत्त्ववेत्ता आणि नेत्यामध्ये असायला हवे , असे पाश सुचित करतो. मोदकाचेही दोन-तीन अर्थ आहेत. ज्याच्यामुळे आनंद होतो असा सात्विक आहार महापुरुषांचा असावा. म्हणजेच इंद्रियांचा आहार सात्त्विक असला पाहिजे. शिवाय मोदक हे तत्त्वज्ञानाचेही प्रतीक आहे. मोदकाच्या पापुद्र्याप्रमाणे तत्त्वज्ञानही वरवर चाखणा-यांना फिकेच वाटते. परंतु आतील सारभाग मधुर असतो. आणि जे कर्माचा फळरुपी मोदक देवाच्या हातात ठेवतात त्यांना तो आशीर्वाद देतो.

गणपतीबाप्पाला लंबोदर म्हणतात. कारण , सर्वांच्या ऐकलेल्या गोष्टी स्वतःच्या विशाल उदरात साठवून ठेवण्याची सूचना तो करतो. गणरायाचे पाय लहान आहेत. त्यामुळे तो लवकर धावू शकत नाही. यातून तो असे सुचवितो की , कोणतेही काम करताना उतावीळ होऊ नये. तसेच तोकडे पाय हे बुद्घिवंताचेही मानले जाते.
सुखकर्त्या आणि विघ्नहर्त्या गणेशाचे वाहन उंदीर आहे. गरूड , नंदी या विशाल वाहनांऐवजी गणपतीने उंदराला आपले वाहन केले कारण , तो सर्व भक्तांच्या घरात प्रवेश करू इच्छितो. हा उदार दृष्टिकोन प्रत्येक नेत्याने ठेवायला हवा. तसेच उंदीर हे मायेचेही प्रतीक आहे. आणि या मायेवर फक्त ज्ञानी माणूसच अंकुश ठेवू शकतो , तिच्यावर स्वार होऊ शकतो.
गणपतीला वक्रतुण्ड म्हणतात. म्हणजे ऋद्धिसिद्धिपासून मुख फिरवून राहणा-यालाच ऋद्धिसिद्धि मिळतात. वाकडे-तिकडे चालणा-याला , आडव्या रस्त्याला जाणा-याला जो दंड देतो तो वक्रतुण्ड.
नेता आणि तत्त्ववेत्ता कसा असावा , हे गणपती आपल्या आवडीनिवडीतूनही दाखवितो. त्याला दुर्वा खूप आवडतात. लोकांच्या दृष्टीने ज्याला काही महत्त्व नाही , असे गवत त्याने स्वतःचे मानले आणि त्याचे महत्त्व वाढविले. नेत्याने आणि तत्त्ववेत्त्यानेही अशाच दुर्लक्षितांना आपले मानले पाहिजे. गणपतीला लाल फुल आवडते. कारण लाल रंग क्रांतीचा आहे. नेता आणि तत्त्ववेत्त्यालाही क्रांती प्रिय असायला हवी , असे त्यामागचे तत्त्वज्ञान आहे.
म्हणूनच या गणरायाचं वर्णन ॐकार असं केलं जातं.
अकार चरण युगल । उकार उदर विशाल ।
मकार महामंडल । मस्तकाकारें ।।

- संस्कृति पूजन या संग्रहातून साभार

पुढल्या वर्षी बाप्पा लवकर येणार

यंदा गणपती बाप्पाच्या आगमनासाठी १५ सप्टेंबरपर्यंत वाट पाहावी लागली होती. पुढील वर्षी मात्र सर्वांचा आवडता गणराय बारा दिवस अगोदर म्हणजेच ३ सप्टेंबर रोजी भक्तांच्या भेटीला येणार असल्याची माहिती सुप्रसिद्ध पंचागकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली.
तसेच २००९ मध्ये ऑगस्ट महिन्यातच गणेशाचे आगमन होणार आहे.

२००८ मध्ये ३ सप्टेंबर रोजी; तर २००९ मध्ये २३ ऑगस्ट रोजी, २०१० मध्ये ११ सप्टेंबर, २०११ मध्ये १ सप्टेंबर, २०१२ मध्ये १९ सप्टेंबर आणि २०१३ मध्ये ९ सप्टेंबर रोजी गणरायाचे आगमन होणार असल्याचे सोमण यांनी सांगितले. २०१२ मध्ये उशिरा म्हणजेच १९ सप्टेंबरपर्यंत गणेशाच्या आगमनाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

अंबेजोगाई योगेश्वरी

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांशिवाय इतर काही प्रसिद्ध अशी आदिमायेची शक्तीस्थानं आहेत. त्यापैकी 'अंबेजोगाई' या ठिकाणाचे अंबेजोगाई योगेश्वरीचे मंदिर होय. बीड जिल्ह्यात हे क्षेत्र वसले आहे. परभणी किंवा नांदेडला उतरून एस.. टी., सुमो आदि वाहनांनी तुम्ही 'अंबेजोगाई' या तालुक्यात पोचू शकता.

अंबेजोगाई येथील देवीचे नाव आहे योगेश्वरी. या देवीच्या स्थानासंदर्भात काही आख्यायिका आहेत. देतासूर नामक दैत्याचा वध करण्यासाठी देवीने घेतलेला अवतार म्हणजे योगेश्वरीचा अवतार असे कोणी म्हणतात. योगेश्वरी हा पार्वतीचाच अवतार समजला जातो! अंबेजोगाई' येथील ग्रामस्थांची ही ग्रामदेवता आहे.

ही देवी कुमारिका आहे व देवीचा अवतार कुमारिकेचा का, याची देखील आख्यायिका सांगितली जाते. पार्वतीने 'त्रिपुरसुंदरी' नामक अवतार घेतला व तिचा परळी येथील वैजनाथ (बैद्यनाथ) यांच्याशी विवाह निश्चित झाला होता. पण त्रिपुरसुंदरीला कुमारिकाच रहायचे होते. लग्नाच्या निमित्ताने त्रिपुरसुंदरी आणि सर्व वऱ्हाड 'परळी' गावाजवळ असणाऱ्या 'अंबेजोगाई' येथील शिवलेण्यात वास्तव्याला आले. विवाहमुहूर्ताच्या वेळी 'त्रिपुरसुंदरी' आपल्या जागेवरच बसून राहिली. तिने ठामपणे विवाहास नकार दिला. लग्नाच्या कारणाने कोकणातील मूळ देवता 'अंबेजोगाई' येथे आली व तेथेच राहिली, असेही या संदर्भात सांगितले जाते.

खरं तर मार्गशीर्ष शुद्ध पौणिर्मा हा देवीचा जन्मदिवस. त्यामुळे अंबेजोगाई येथील मंदिरात मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी ते पौणिर्मा असा नवरात्रौत्सव साजरा करतात. पण योगेश्वरी हा देवीचा अवतार म्हणजेच देवीचे रूप असल्याने शारदीय नवरात्रही येथे थाटामाटात साजरे करतात.

देवीच्या हातात शस्त्रायुद्धांबरोबरच परडीही आहे. शारदीय नवरात्रात काकड आरती, दुपारचा नैवैद्य आणि मुख्य म्हणजे देवीला प्रसाद म्हणून तांबूल (विडा) देण्याची पद्धतही येथे आहे. शारदीय नवरात्रात अष्टमीला शतचंडी हवन करण्याची प्रथा असून, नवमीला पूर्णाहूती असते. दसऱ्याला 'अंबेजोगाई' मंदिरातील जी मूतीर् 'उत्सवमूतीर्' म्हणून असते, तिची पालखीतून गावभर मिरवणूक काढली जाते. यावेळी गोंधळी व आराधी बायका यांची उपस्थिती असते. जोगवा मागितला जातो. रात्री मिरवणूक पुन्हा देवळात परतल्यावर प्रसादाचे वाटप होते. मार्गशीर्षातील नवरात्रोत्सवातही पौणिर्मेला अशी उत्सवमूतीर्ची पालखीतून मिरवणूक काढली जाते. कारण तो देवीचा जन्मोत्सव असतो. त्या उत्सवातही शतचंडी हवन केले जाते.

योगेश्वरीची मूतीर् शेंदरी रंगाची असून तिचे रूप उग्र आहे. अष्टमी आणि दसऱ्याला देवीला सर्व दागिन्यांनी सुशोभित केले जातं. नवरात्रात रोज साधारणपणे दहा हजार लोक देवीच्या दर्शनाला येतात. अंबेजोगाई येथे काही हॉटेल्स आहेत. त्यापैकी 'कृष्णाई' हॉटेल मुक्काम व जेवणखाणासाठी विशेष प्रसिद्ध आहे. येथे वाड्यामध्ये जे गुरुजी वास्तव्य करतात, त्यांच्याशी संपर्क साधता अभिषेक- पूजा याची सोय होऊ शकते. मात्र गाभाऱ्यात बसून पूजा करताना पुरुषाने सोवळे (कद) नेसणे अनिवार्य असते.

' थोरली जाऊ' चित्रपटातील 'आदिमाया अंबाबाई' हे सुधीर मोघे यांचं गीत कोल्हापूर, तुळजापूर, माहूर, अंबेजोगाई अशा तीर्थक्षेत्री चित्रीत झालंय. त्यात अंबेजोगाईचं वर्णन करताना म्हटलंय.

'' अमरावतीची देवता शाश्वत अमर

अंबेजोगाईत तिने मांडीयले घर

मुंबापुरीच्या गदीर्ला दान चैतन्याचे देई'' खरोखरच मुंबईकरांना आणि कोकणवासियांना कोकणस्थांची कुलदेवता असणारी अंबेजोगाई चैतन्याची प्रेरणा देते.

- गणेश आचवल

देविमाहात्म्य - दुर्गा

दुगेर्चे सर्वप्रथम वर्णन व स्तोम महाभारतात आढळते. भक्तांची विघ्ने, अरिष्टे आणि संकटे निवारण करणारी दुर्गा असे प्राचीन काळीही समजले जात असे. श्री कृष्णाने वृंदावनात तिची पूजा केली. मधुकैटभ दैत्यांच्या भीतीने ब्रह्मदेवाने त्रिपुरा विजयाच्या वेळी शंकराने ऐश्वर्यभ्रष्ट झालेल्या इंदाने आणि अनेक ऋषी मुनींनी दुगेर्ची उपासना केल्याचे दिसून येते. महिषासूर, चंडमुंड व शुंभनिशुंभ या दैत्यांना दुर्गादेवीने ठार मारले. दुगेर्ची प्रतिमा हे राष्ट्रशक्तीचे प्रतिरूप मानले जाते. सिंह हे तिचे वाहन आहे. दुर्गादेवीची मूतीर् ही चतुर्भुज, अष्टभुज, किंवा दशभुज असल्याचे दाखवले जाते. महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती ही दुगेर्चीच रूपे आहेत. त्यापैकी महाकाली ही तमोगुणी, महालक्ष्मी ही रजोगुणी आणि महासरस्वती ही सत्त्वगुणी मानली जाते. मार्कंडेय पुराणात दुगेर्ची अवयवनिमिर्ती कशी झाली ते दिलेले आहे. दुगेर्ची रौद आणि सौम्य रूपे आढळतात. भारतातील सर्व समाजात दुर्गामाता अधिक प्रिय देवता असल्याचे दिसून येते.

दा. कृ. सोमण

एकविरा आई तू डोंगरावरी

नवसाला पावणारी , कोळ्यांचे आराध्य दैवत असणारी देवी म्हणून एकविरा देवीला हिंदू समाजात वेगळेच स्थान आहे. मंदिराचे वेगळेपण लेण्यांमध्ये असलेले तिचे स्थात , प्राचीनता आणि तिचं लोभसवाणं रूप यामुळे या देवीचे महत्त्व काही वेगळेच आहे.

एकविरा देवीचा महिमा जसा आगळा तसंच तिचं स्थानही. कार्ल्याच्या लेणीमध्ये या देवीचे मंदिर असून देवळाच्या भोवती निसर्गही सिद्धहस्ते वंदन करत आहे. कार्ल्यामध्ये ह्या देवीचे मंदिर आहे. लोणावळयापासून ११ किमीवर ह्या देवीचे स्थान आहे. देवळाच्या सभोवती घनदाट झाडी , पांढरे शुभ्र धबधबे आणि थंडगार आनंदी वातावरण असे निसर्गाचे वरदान लाभले आहे. देवीच्या दर्शनासाठी डोंगर चढून जावे लागते. पण डोंगर चढताना दिसणारा इंदायणी नदीचा प्रवाह आणि विसापूर , लोहगड , तुंग असे गडकल्ले हा परिसर मोहून घेतात.

एकविरा देवी रेणूकेचे रूप आहे. या देवीची एक अख्यायिका आहे. आदितीने तप करून भगवान शंकराला प्रसन्न केले. त्याने तिला वर दिला की इश्वाकू राजाच्या घरी तुझा जन्म होईल आणि तुझे नाव रेणुका असेल. तुला होणाऱ्या पाच पुत्रात एक पुत्र महावीर असेल. त्याच्या पराक्रमामुळे तू एकविरा म्हणून ओळखली जाशील. चांदसेनीय कायस्थ प्रभू (सीकेपी) आणि कोळी समाजात या देवीला विशेष स्थान असले तरी सामान्य पर्यटकांपासून ते भक्तगणांपर्यंत सर्वांच्या मनात नवसाला पावणारी देवी म्हणून ' एकविराआई ' ची प्रतिमा आहे.

एकविरेचे स्थान स्वयंभू आहे. तेजस्वी नेत्र असलेल्या या देवीच्या मुखमंडलावरील हास्य सौम्य आणि प्रसन्न आहे. कोळी आणि आगरी समाजाची कुलदेवता म्हणून या देवीची महती असली तरी सर्वाच भाविकांची ती स्फूतीर्देवता आहे. देवीचे मंदिर अत्यंत प्राचीन आहे. आणि कार्ल््याच्या लेणीत तिचे मूळ स्थान आहे. नवरात्रामध्ये या देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गदीर् होते. घटस्थापनेपासून ते दसऱ्यापर्यंत विविध धामिर्क कार्यक्रम आयोजित केले जातात. नवमीच्या दिवशी पहाटेच महानवमी होमाला सुरुवात होते हा दिवस भक्तांसाठी परमोच्च असतो. नवसाला पावणाऱ्या या देवीच्या उत्सवात भक्तीचा पूर वाहत असतो. मंदिर भक्तगणांनी भरलेले असते दर्शनासाठी लांबच लांब रांग लावून भक्त उभे असतात. देवीची पूजा , आरती आणि नित्यपाठच्या वेळाही ठरलेल्या असतात. गावकऱ्यांच्यादृष्टीनेही हा देवीचा उसव म्हणजे दिवाळीच असते. नऊ दिवस उत्सवाचे आणि त्याआधी व नंतर तयारीचे म्हणून धांदलीत असतात. गावात येणाऱ्या प्रत्येक भक्तगणाला निवास आणि प्रसाद मिळावा यासाठी देवस्थान ट्रस्ट आणि गावकरी उत्सवाच्या आधीपासूनच तयारी करत असतात. कोळी समाजाच्या लोकांची उत्सवाच्या काळात विशेष गदीर् असते. प्राचीन कालीन मंदिर म्हणून या मंदिराची ओळख असली तरी बुद्ध कालीन लेण्यांच्या निमिर्ताीचा बाजही या देवळावर आढळतो. परदेशातून येणारे पर्यटक , लेण्या बघायला येणारे ट्रेकर्स सर्वच जण देवीच्या दर्शनाशिवाय पुढे जाऊ शकत नाहीत. लोणावळयापासून ११ किमीवर असलेल्या या देवस्थानाला येण्यासाठी कार्ला स्टेशनला उतरून पुढे चालत जावे लागते. त्यानंतर डोंगर चढून उंचावर असलेल्या या देवीचे दर्शन घ्यावे लागते. तिचे मूळ स्थानच कार्ल्याच्या लेणीत असल्याने भक्तगणांचे पाय आपोआपच या डोंगराकडे वळतात. श्री एकविरा देवस्थान ट्रस्टतफेर् येणाऱ्या भक्तांसाठी वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच नवरात्र महोत्सवाची जबाबदारीही या ट्रस्टतफेर्च सांभाळली जाते. भक्तांसाठी येथे निवासाचाही व्यवस्था असून प्रसादही ट्रस्टतफेर् दिला जातो.

डोंगरातलं स्थान , प्रसन्न रूप , जागरूक देवस्थान आणि नवसाला पावणारी देवी म्हणून महत्त्व असलेल्या या देवीचं लोभसवाणं रूप प्रत्येक भक्तांने एकदा तरी डोळयात साठवून घ्यायला हवे.

- यामिनी सप्रे

देविमाहात्म्य - रेणुका

रेणुकादेवी जमदग्नीची पत्नी आणि परशुरामाची आई! प्राचीन काळी कान्यकुब्ज देशात इक्ष्वाकुवंशीय रेणू नावाचा राजा होता. या राजाने कन्याकामेष्टी यज्ञ केला. त्या यज्ञातून ही कन्या प्रकट झाली. म्हणून तिचे नाव रेणुका ठेवले. कामली हे तिचे पाळण्यातील नाव आहे.
भागीरथी क्षेत्री झालेल्या स्वयंवरात तिने जमदग्नीला वरले. माहूर हे रेणुकादेवीचे प्रमुख स्थान म्हणजे मूळपीठ मानतात. कर्नाटकात रेणुकादेवीची पूजा 'यल्लमा' या नावाने करतात.
हिला आदिशक्ती म्हणून मानले जाते. एकवीरा हेही रेणुका देवीचेच नाव आहे. रेणुकादेवी यमाई या नावानेही ओळखली जाते. नाशिक जिल्ह्यात चांदवड येथील डोंगरावर रेणुकादेवीचे मंदिर आहे. सौदत्ती व कार्ले येथील एकवीरेची स्थाने प्रसिद्ध आहेत. रेणुकेसंबंधीची बरीच माहिती रेणुका माहात्म्य या ग्रंथामध्ये सापडते.

- दा. कृ. सोमण

पुण्याची चतु:श्रृंगी

पुण्याच्या पश्चिमेला चार टेकड्यांमध्ये चतु:श्रुंगी मातेचे मंदिर वसलेलं आहे. श्रुंग म्हणजे टेकडी. म्हणूनच हे मंदिर चतु:श्रुंगी या नावाने प्रसिद्ध झाले आहे. चतु:श्रुंगी मंदिराच्या स्थापनेमागे एक कथा प्रचलित आहे. २५० वर्षांपूर्वी दुर्लभशेठ नावाचे सप्तश्रुंगी मातेचे निस्सिम भक्त होऊन गेले. दरवर्षी सप्त:श्रुंगी मातेच्या दर्शनासाठी ते वनीला जात असत. पण वयोमानानुसार त्यांना नियमित जाणे अशक्य होऊ लागले. त्यांच्या भक्तीला प्रसन्न होऊन देवीने त्यांना स्वप्नामध्ये ' माझे रूप तुला पश्चिम दिशेला मिळेल. तिथे माझी प्रतिष्ठापना कर ,' असा दृष्टांत दिला.

आज हे मंदिर गर्द झाडीमध्ये आहे. सुमारे ३.५ एकर परिसरात ते बांधण्यात आले आहे. साधारणत: ४५० फुट उंचीवरील या मंदिरात पोहचण्यासाठी १५० पायऱ्या सर कराव्या लागतात. देवीच्या मंदिरात प्रवेश करण्यापूवीर् डाव्या बाजूला गणपतीचे मंदिर बांधण्यात आले आहे. तसेच देवीच्या मंदिरात महादेव , तुळजाभवानी , सप्तश्रुंगी माता आणि खरजाई देवीची लहान मंदिरे आहेत. गाभाऱ्यातील शांत वातावरणामुळे मन प्रसन्न होते.

दरवषीर् या मंदिरात नवरात्र मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जाते. संपूर्ण भारतातून तसेच परदेशांतूनही एक लाखाहूून आधिक भाविक येथे दर्शनासाठी गदीर् करतात. मंदिराचे विश्वस्त सामाजिक बांधिलकीचे भान

ठेवून नवरात्र जागवण्याचा प्रयत्न करत असतात. या देवीस्थानाचे वैशिष्ट्य म्हणजे निर्माल्यापासून गांडूळ खत तयार करण्यासाठी मंदिराच्या परिसरामध्ये ' इनोरा ' या पर्यावरणवादी संस्थेने प्रकल्प चालू केला आहे. नवरात्रीमध्येच नव्हे , तर पूर्ण वर्षभर या प्रकल्पातून खत तयार करण्यात येते.

नवरात्रीच्या पहिल्या माळेला देवीला अभिषेक करण्यात येतो. त्यानंतर रोज दिवसातून दोनदा आरती केली जाते. कोजागिरी पौणिर्मेपर्यंत मंदिराच्या परिसरात मोठ्या प्रमाणात जत्रा भरवण्यात येते. जत्रेमध्ये विविध प्रकारचे खाद्यपदार्थ , सांैदर्यप्रसाधने , खेळणी यांचे स्टॉल्स असतात. तसेच मनोरंजनासाठी जाएण्ट व्हील , धडकगाडी यांसारखी साधने असतात. या सर्वच गोष्टी भाविकांना आकषिर्त करतात. यंदा या जत्रेमध्ये ७०पेक्षा आधिक स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. भाविक आणि स्टॉलधारकांच्या सुरक्षिततेसाठी विश्वस्त मंडळाने दोन कोटी रुपयांचा विमा उतरवला आहे. गैरप्रकार घडू नयेत यासाठी दक्षता म्हणून मंदिरपरिसरात शंभराहून आधिक पोलिस , होमगार्ड आणि स्वयंसेवक तैनात करण्यात आले आहेत. वृद्ध भाविकांना गाभाऱ्याचे दर्शन घेता यावे यासाठी मंदिराच्या पायथ्याशी सीसीटीव्हीची व्यवस्था करण्यात आली आहे.

मंदिराच्या गाभाऱ्यात ३३ किलो चांदीची देवीची मूतीर् आहे. ती सोन्याच्या दागिन्यांनी सजविलेली आहे. दसऱ्याला सीमोल्लंघनासाठी १९ किलो चांदीच्या पालखीमधून देवीचा छबीना निघतो. या भव्य मिरवणुकीमध्ये असंख्य महिला देवीला औक्षण करतात. सामाजिक बांधिलकीची जाणीव म्हणून गुलाल न उधळता आणि फटाके न वाजवता मिरवणूक शांत वातावरणात पार पाडली जाते. मंदिराला प्रकाशझोतात आणण्यासाठी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष दत्ता गायकवाड , कार्यकारी अध्यक्ष नंदकुमार अनगळ आणि माणिक बिर्ला , अरुण अनगळ आदी सदस्यांचा सिंहाचा वाटा आहे.

- करुणा गोसावी

देविमाहात्म्य नारायणी - 'महाकाली'

ही एक तांत्रिक देवता आहे.
आदिशक्तीच्या तम:प्रधान रौद रूपाला 'महाकाली' म्हणतात.
ती दुष्टांचा संहार करण्यासाठी प्रकट होते, अशी समजूत आहे.
मधु-कैटभ या दैत्यांचा नाश करण्यासाठी ती अवतरली असे 'देवी भागवता'त म्हटले आहे.
शाक्त संप्रदायात 'महाकाली' या नावाने देवीची उपासना केली जाते.
श्रीविद्यार्णव तंत्रात तिचे रूपध्यान वर्णन केलेले आहे.
कृष्णवर्ण, दशमुख, त्रिनेत्र, दशभुज, दशपाद असून खड्ग, शर, त्रिशूळ, गदा, चक्र, पाश इत्यादी आयुधे तिने धारण केली आहेत.
महाकाली भक्तांना वरदायिनी होते आणि त्यांचे संरक्षणही करते. दक्षिण भारतात ही ग्रामदेवता मानली जाते.

- दा. कृ. सोमण

मांढरदेवची - काळूबाई

सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातल्या पश्चिमेस उंच डोंगराव असलेल्या मांढरदेव येथील श्री काळेश्वरी देवी ऊर्फ काळूबाई हे संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान अर्थात कुलदेवता आहे. समुदसपाटीपासून साडेचार हजार फूट उंचीवर असलेले हे दैवत जागृत स्थान असून भाविकांबरोबरच पर्यटकांच्या दृष्टीनेही सौंदर्याची खाण आहे. वाईपासून २० तर सातारापासून वाई मागेर् ५५ किलोमीटर अंतर असणाऱ्या या डोंगरावर जाण्यासाठी वाई व भोर या दोन्ही बाजूंनी पक्का घाट रस्ता आहे. रम्य गर्द वृक्षराईत या देवीचे पुरातन मंदीर असून ही देवी नवसाला पावते अशी भाविकांची भावना असल्याने दरवषीर् यात्रेप्रमाणेच नित्यनेम म्हणूनही लाखो भाविक येथे दर्शन व नवस चुकते करण्यासाठी येतात. दरवषीर् शाकंबरी पौणिर्मेला या देवीची मुख्य यात्रा भरते. त्याअगोदर दोन दिवस व पुढे दोन दिवस अशी एकूण ५ दिवसाची ही यात्रा साधारणपणे पौष मराठी महिन्यात तर जानेवारी या इंग्रजी महिन्यात भरते. जागर, छबिना, यात्रेच्या मुख्य दिवशी महाअभिषेक, पूजा व उत्तर यात्रा असे या यात्रेचे स्वरूप असून यात्रेशिवाय मंगळवार, शुक्रवार या देवीच्या वारी तसेच अमावास्या व पौणिर्मेला वर्षभर या ठिकाणी भाविकांची गदी होते.

निसर्गरम्य सृष्टीसौंदर्य लाभलेल्या या परिसरात वाईहून मांढरदेवकडे जाताना घाटातून पांडव गड, माळवा पठार, कृष्णा नदीवरील धोम धरण दृष्टीस पडते. भर पावसाळ्यात हिरव्यागार गालीचामध्ये हा डोंगर व त्यातून वाहणारे पाण्याचे धबधबे मनाला वेगळा आनंद देतात. मांढरदेव डोंगरावर या पठाराची लांबी १९ किलोमीटर असून पठाराच्या वायव्येस ६६० मीटर खोल दरी आहे. डोंगरावर भासणारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्ान् शासनाने धोम धरणातून पाणी आणून कायमचा संपवला आहे. मांढरदेव देवस्थान ट्रस्टचे वतीने देवालय परिसर विकासाबरोबरच गावात विविध शैक्षणिक, सामाजिक उपक्रम राबवले जातात. तसेच गावच्या विकास कामांनाही मोठा हातभार लावला जातो. देवस्थानला भाविकांकडून देणगीरूपात मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते. त्यातील ४० टक्के हिस्सा हा गावकामासाठी वापरला जातो. या परिसरात अनेक भाविक नवस फेडण्यासाठी येतात त्यात कोंबड्या, बकऱ्या मारणे, झाडांना खिळे ठोकणे हे प्रकार पूवीर् केले जात असत मात्र प्रशासनाने खंबीर भूमिका घेत या प्रथा मागील २-३ वर्षांपासून पूर्णत: बंद करत आणल्या आहेत. २५ जानेवारी २००५ रोजी यात्रेच्या मुख्य दिवशी येथे मोठी दुर्घटना घडून त्यात २९१ जणांना प्राण गमवावे लागले होते. यात्राकाळात दर्शनरांग व पायऱ्यांचे मजबूतीकरण, लोखंडी रेलींग, सुरक्षित कठडे, अशा कायमस्वरूपी सुरक्षा योजना येथे करण्यात आल्या आहेत. पशुहत्या व पशुसंहार हा पूर्णत: बंद करण्यात आला आहे. नवरात्री सणानिमित्त मंदीरास विद्युत रोषणाइं करण्यात आली असून मागील वर्षापासून ट्रस्टमार्फत अखंड नंदादीप योजनेमध्ये देवीच्या गाभाऱ्यात अखंड नंदादीप तेवत ठेवला जातो. यासाठी भाविकांनी दिलेल्या वर्गणीतून तेल खरेदी करून हे तेल नंदादीपात अर्पण केले जाते. मांढरदेव येथे बेकायदेशीर दारूविक्रीही बंद करण्यात आली आहे. समाजाच्या अंधश्रद्धेतून या इथे केले जाणारे चिठ्ठ्या, बिब्बे ठोकणे, भानामती, करणी करणे इ. प्रकारांचे मांढरदेव परिसरातून जवळजवळ उच्चाटन झाले आहे. प्रशासनाने २ वर्षांपासून सर्व यात्रा काळात मांढरदेव गडावर वाहनांसाठी पाकिर्ंग, दर्शनरांग, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था चांगल्या प्रकारे केली आहे. दुर्घटनेनंतर मंदीर परिसरात नारळ फोडणे, दीपमाळेत तेल घालण्यास मनाई करण्यात आली आहे. देवीच्या गाभाऱ्यात जावून दर्शन घेणाऱ्यांसाठी एक रांग तर दर्शन घेऊन खाली उतरण्यासाठी विशेष स्वतंत्र मार्ग करण्यात आला आहे. मंदीर परिसरात वृक्ष लागवड जोपासण्यासाठी लवकरच ट्रस्टमार्फत वन उभारले जाणार आहे.

काळेश्वरी देवीचे मंदीर हे पूर्वाभिमूख असून पुढे २ दीपमाळा आहेत. दगडी मंडप आणि गाभाऱ्यात ही स्वयंभू काळेश्वरीची मूतीर् आहे. सिंहावरून आलेली ही देवी येथे वसली आहे. डोक्यावर चांदीचा मुगुट आणि गळ्यात सोन्याचे लखलख दागिने असणाऱ्या देवीला पुरणावरणाचा नैवेद्य दाखविला जातो. स्वयंभूमूतीर्च्या पुढे अतिशय सुबक व रेखीव, देखण्या देवीचा चेहरा पाहताच भक्तांना एवढा उंच डोंगर चढून आल्याने जाणवणारा शिणवटा पार पळून जातो. अलीकडे कृष्णा तर पलीकडे नीटा नदीच्यामध्ये डोंगरावर वसलेल्या या देवीला कालिका, काळूबाई, काळूआई, काळेश्वरी अशा विविध नावांनी ओळखले जाते. भक्तांच्या नवसाला पावणारी, काळावर नियंत्रण करणारी ही देवी आणि तिच्या दर्शनाची आस लागलेले भक्त पूवीर् बोपडीर्, धावडी, पिराचीवाडी, गुंडेवाडी, लोहोम व भोर या गावांच्या बाजूने डोंगरकडा चढून दर्शनाला येत असत. आता पुण्याहून भोरमागेर् तर साताऱ्याहून वाईमागेर् दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांच्या संख्येत दरवषीर् वाढच होत आहे. अशा या मांढरदेव निवासीनी काळेश्वरीच्या दर्शनासाठी नवरात्रीनिमित्त भाविकांच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागत आहेत. नवरात्रीत पहाटे पूजाअर्चा होऊन नवी साडी व सोन्याचा मुखवटा, दागिने देवीला घातले जातात.

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान - मांढरदेवची काळूबाई अखंडनंदादीप व जागरण नवरात्र केले जाते.

- अतुल देशपांडे, सातारा.

देविमाहात्म्य - जगदंबा

जगदंबा हे देवीचे सौम्य रूप आहे.
जगदंबेप्रमाणेच उमा, गौरी, पार्वती, भवानी ही देखिल देवीच्या सौम्य रुपाची नावे आहेत.
दुर्गा, काली, चंडी, भैरवी आणि चामुंडा ही देवीची उग्र रूपे समजली जातात.
सर्व देवांच्या ठिकाणी असलेल्या शक्तीचे दैवतीकरण होउन त्या शक्तिरूप देवी असे म्हणतात.
शाक्तसंप्रदायी लोकांनी तिला जगदंबा म्हणून गौरवले आहे.
जगदंबा ही सर्व जगताची अंबा म्हणजे माता आहे.
जगदंबेची मूर्ती ही चार हात असलेली आढळते.
तसेच जगदंबेने एक बालक ह्द्याशी धरलेले दिसते.
ही वात्सल्याची देवता आहे.
देवीमाहात्म्यामध्ये चौथ्या अध्यायातील पहिल्या २७ मंत्रांमध्ये देवानी जगदंबेची स्तुती केलीय.
खजुराहो, देवबंध येथील जगदंबेची मंदिरे प्रसिद्ध आहेत.

आदिमाता 'जीवदानी'

ऐतिहासिक आणि पौराणिक महत्व असलेल्या विरारच्या जीवदानी देवीबद्दल अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. फार पूर्वी गडाच्या पायथ्याशी एका शेतकऱ्याच्या शेतात रोज एक गाय चरण्यासाठी येत असे. दिवसभर चरल्यानंतर ती डोंगरमाथ्यावर निघून जायची. त्या गायीबद्दल शेतकऱ्याच्या मनात कुतूहल जागं झालं. एकदा त्याने तिचा पाठलाग केला. डोंगरावरच्या एका मैदानात ती गाय थांबली आणि त्याचक्षणी तिथे एक तेजस्वी स्त्री प्रकट झाली. ती गाईची मालकीण असावी असं समजून शेतकऱ्यांने तिच्याकडे , आपल्या शेतात गाय चरते म्हणून पैशांची मागणी केली.

ती स्त्रीने शेतकऱ्याच्या हातावर पैसे ठेवत असतानाच शेतकऱ्यांने आपण अस्पृश्य असल्याचं सांगितलं. मला स्पर्श करू नकोस अशी विनंती त्याने करताक्षणीच ती तेजस्वी स्त्री नाहीशी झाली. शेतकरी अवाक् होऊन हे सर्व पाहत असतानाच त्याला दुसरा धक्का बसला. त्या गाईने मोठा हंबरडा फोडून कड्यावरून खोल दरीत स्वत:ला झोकून दिलं. गाईच्या बलिदानाचं रहस्य अजूनही गुलदस्त्यातच आहे. मात्र गाईने जीवाचं दान केलं म्हणून त्या डोंगराला ' जीवदानीचा डोंगर ' आणि डोंगरावर वास्तव करणारी आदिमाता ' जीवदानी ' म्हणून प्रसिद्ध झाली.

गाईने जिथून उडी घेतली तिथे एक ' तांदळा ' ( अष्टविनायकाच्या स्वरूपातलं मूतीर्चं रूप) ठेवला होता. भाविक त्याचीच पूजा करत. पूर्वी गुराखीच शिळेची पूजा करत. त्यानंतर बारकीबाय नावाची भक्त तिथे पूजा करू लागली. १९५६ मध्ये भक्तांनी देवीच्या मूतीर्ची प्राणप्रतिष्ठा केली. २३ फेब्रुवारी १९५६ रोजी बारकीबायच्या पुढाकाराने ट्रस्टची स्थापना झाली.

जीवदानीच्या पायथ्याशीच गणेश मंदिर आहे. तिथून गडाची उंची नऊशे फूट असून एकूण चौदाशे पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या दुतर्फा असलेल्या हिरव्यागार नयनरम्य वनराईतून गडावर चढायला सुरुवात केल्यानंतर थकवा जाणवतच नाही. मुख्य मंदिरात दगडातच गाभारा करून तिथे देवीची मूतीर् बसवण्यात आली आहे. उजव्या हाताने भक्तांना आशिर्वाद देणाऱ्या देवीचं दर्शन होताच भाविकांचा थकवा दूर होतो. मंदिराच्या परिसरात अनेक गुंफा असून त्या पांडवकालीन असल्याचं सांगितलं जातं. त्यात कालिकामाता , भैरवनाथ , बारोंडा देवीची मंदिरं आहेत. त्याच्या शेजारीच मानकुंड नावाची पाण्याची कुंडं आहेत. डोंगरावरून विरार आणि परिसराचं विहंगम दृश्य दिसतं. डोंगरावरून खाली उतरलं की पापडखिंड धरणाच्या निसर्गरम्य परिसरात जीवदानी देवीची बहिण बारोंडा देवीचं तसंच महादेवाचं मंदिर आहे. याठिकाणी महाशिवरात्रीला मोठी जत्रा भरते.

जीवदानीचा डोंगरावर १७ व्या शतकात जीवधन नावाचा गडकोट किल्ला होता. तटाचे काही कोरीव दगड भग्नावस्थेत आढळतात. मराठ्यांच्या ताब्यात असलेल्या किल्ल्यावर २७ मार्च १७३१ रोजी फिरंगी सरदाराने हल्ला केला होता. त्यावेळी गडावर फक्त शंभर मराठे होते. म्हणून मराठे किल्ला सोडून पळून गेले. त्यानंतर चिमाजीअप्पांनी आदेश दिल्यावर बरवाजी ताकपीर याने तीनशे सैनिकांसह हल्ला करून जीवधन गड ३१ मार्च १७३९ रोजी सर केला. टेहळणीसाठी मोक्याची जागा म्हणून किल्ल्याला महत्व होतं. पण किल्ला उपेक्षित राहिल्याने त्याचं अस्तित्वच संपुष्टात आलं.

मात्र जीवदानी देवीमुळे या परिसराला तीर्थस्थानाचा दर्जा मिळाला आहे. सध्या जीवदानी देवीची महती वाढल्याने इथे दरदिवशी हजारो भाविक गदीर् करतात. मंगळवार , शुक्रवारी इथे बरीच गदीर् होते. नवरात्रीचे नऊ दिवस गडावर उत्सव असतो. दसऱ्याच्या दिवशी तर एक लाखापेक्षा अधिक भाविकांची उपस्थिती असते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवीला अभिषेक , महावस्त्रालंकार परिधान केल्यानंतर घटस्थापना केली जाते. दुर्गाष्टमीला विविध पूजा केल्या जातात. विजयादशमीला महाभिषेक केला जातो. भाविकांच्या वाढत्या संख्येला आवश्यकतेनुसार मंदिराचा जीणोर्द्धार करून त्याचं विशाल मंदिरात रूपांतर करण्यात आलं आहे.

मंदिराच्या सभागृहाच्या नव्वद फूट खाली असलेल्या पठारावर सात मजली इमारत बांधण्यात आली आहे. त्यामुळे देवीच्या गाभाऱ्यासमोर पाच हजार फुटांचं सभागृह तयार झालं आहे. पायथ्यापासून गडावर चढण्यासाठी प्रशस्त पायऱ्या असून भाविकांना ऊनपावसांचा त्रास होऊ नये म्हणून पत्र्यांचं छत उभारण्यात आलं आहे. आता फनिक्युलर रोप रेलचा प्रकल्प लवकरच पूर्ण होणार आहे. त्यामुळे रेल्वेगाड्यांसारख्या डब्यात बसून गडावर जाण्याची व्यवस्था होईल.

- शशी करपे

देविमाहात्म्य - महाकाली

' महाकाली' ही एक तांत्रिक देवता आहे.
आदिशक्तीच्या तम:प्रधान रौद रूपाला 'महाकाली' म्हणतात.
ती दुष्टांचा संहार करण्यासाठी प्रकट होते, अशी समजूत आहे.
मधु-कैटभ या दैत्यांचा नाश करण्यासाठी ती अवतरली असे 'देवी भागवता'त म्हटले आहे.
शाक्त संप्रदायात 'महाकाली' या नावाने देवीची उपासना केली जाते.
श्रीविद्यार्णव तंत्रात तिचे रूपध्यान वर्णन केलेले आहे.
कृष्णवर्ण, दशमुख, त्रिनेत्र, दशभुज, दशपाद असून खड्ग, शर, त्रिशूळ, गदा, चक्र, पाश इत्यादी आयुधे तिने धारण केली आहेत.
महाकाली भक्तांना वरदायिनी होते आणि त्यांचे संरक्षणही करते.
दक्षिण भारतात ही ग्रामदेवता मानली जाते.

- दा. कृ. सोमण

Thursday, October 18, 2007

जय माता दी..! (वैष्णोदेवी)

' प्यार से बोलो जय माती दी... ' म्हणत डोंगर चढून वैष्णोदेवीच्या दर्शनाला चालत जाणारी छोटी-छोटी मुलं पाहिली की आश्चर्य वाटतं. वैष्णोदेवीच्या डोंगराची चढण चढण्यासाठी अवघड खरी पण मनात अपार श्रद्धा असलेले जगभरातील कानाकोपऱ्यातून भाविक आनंदात मातेच्या दर्शनासाठी जातात.

जम्मू-काश्मीरमधल्या उधमपूर जिल्ह्यात कटरा नावाचं गाव आहे. तिथून जवळच असलेल्या त्रिकूट डोंगरावर वैष्णोदेवीचं स्थान आहे. तीन देवींच्या शक्तींचं रूप म्हणून वैष्णोदेवीचं आराधना केली जाते. डोंगरावर चढून जाणं मोठं अवघड काम आहे. सुमारे बारा ते पंधरा किमी अंतराचा चढ चढून जातात. काही जण घोड्यावरूनही यात्रा करतात. या यात्रेला ' माता का बुलावा ' असं म्हटलं जातं. एकदा का ही यात्रा पूर्ण केली तर मातेचा आशीर्वाद कायमचा तुमच्याबरोबर राहतो , अशी श्रद्धा आहे. माता वैष्णोदेवी वसलेल्या त्रिकूट पर्वताचा उल्लेख ऋग्वेदात आणि महाभारतातही आहे. माता वैष्णोदेवी ज्या गुहेत वसली आहे , ती हजारो वर्षांपूवीर्ची असावी , असं मत भूगोलतज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

वैष्णोदेवीच्या या स्थानाविषयीची एक कथा सांगितली जाते. असुरांचा विध्वंस करत असताना माता महाकाली , महालक्ष्मी आणि महासरस्वती एकेदिवशी एकत्र आल्या. त्यांनी आपलं तेज आणि शक्ती एकत्र करून एका रूपवान मुलीची निमिर्ती केली. मुलीने विचारलं , माझी निमिर्ती तुम्ही कशासाठी केलीत. तेव्हा , पृथ्वीवर जाऊन तिथे सर्वांना सुखसमाधान आणि न्याय मिळवून देण्यासाठी तुझी निमिर्ती केली आहे.

भारतातल्या दक्षिणेत राहणारा आमचे भक्त रत्नाकर आणि तुझी पत्नी यांच्या घरी तुझा जन्म होणार आहे. सर्वांना न्याय देण्यासाठी तुझ्या आध्यात्मिक बळाचा वापर कर. तुला आवश्यक शक्ती प्राप्त होताच तू विष्णूमध्ये विलीन होशील , असं देवींनी तिला सांगितलं.

काही काळानंतर रत्नाकर आणि त्याच्या पत्नीला संुदर कन्यारत्न प्राप्त झालं. तिचं नाव वैष्णवी ठेवलं. अगदी लहानपणापासूनच तिला अधिकाधिक ज्ञान मिळवण्याची इच्छा होती. तिला शिकवणाऱ्या शिक्षकांचं ज्ञानही तिच्यासमोर अपुरं पडत होतं.

ज्ञानप्राप्तीसाठी तिने तपस्येचा मार्ग पत्करला. ती घनदाट जंगलात पोहोचली. त्याच दरम्यान श्रीराम वनवासासाठी जंगलात आले. तेव्हा श्रीराम हे विष्णूचा अवतार आहेत , हे ओळखून तिने त्यांना मला आपल्यात सामावून घ्या , जेणेकरून ती सर्वाेच्च शक्तीचा एक भाग बनूशकेल , अशी इच्छा प्रकट केली. पण श्रीरामाने ही योग्य वेळ नाही , वनवास संपताच पुन्हा भेटीचं वचन दिलं. तिने त्यांना ओळखलं तर ते इच्छा अवश्य पूर्ण करतील , असं सांगितलं.

रामाने आपलं वचन पाळलं आणि रावणाबरोबरच युद्ध संपताच ते परतले ते एका वृद्धाच्या वेषात. त्यावेळी वैष्णवीने त्यांना ओळखलं नाही. याचाच अर्थात सवोर्च्च शक्तीपैकी एक होण्याची वेळ अजून आली नाही असं सांगून रामाने कलियुगात भेटू असं सांगितलं. काल्कीच्या रूपात रामाने अवतार घेतल्यावर ही भेट होणार होती. पण त्यासाठी त्रिकूट डोंगरावर आश्रम उभारून ध्यानधारणा करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार वैष्णवीने ध्यानाला प्रारंभ केला. वैष्णवीच्या तपस्येची माहिती अनेकांना समजली. तांत्रिक गोरखनाथाने तिची परीक्षा पाहायचं ठरवलं. त्यासाठी शिष्य भैरवनाथाला पाठवलं. भैरवनाथाने आश्रमाजवळ पाळत ठेवली.

त्यावेळी तपस्या करणारी वैष्णवी नेहमी आपल्याजवळ धनुष्यबाण बाळगत असल्याचं दिसलं. आणि तिच्या आसपास नेहमी माकडं आणि हिंस्त्र सिंह वावरत असल्याचं पाहिलं. मात्र तिच्या रूपाने त्याच्यावर मोहिनी घातली. त्याने तिच्याशी विवाह करायचं मनोमन ठरवून टाकलं. त्याचवेळी वैष्णवीच्या भक्तापैकी माता श्रीधरने भंडाऱ्याचं आयोजन केलं. त्यात सर्व ग्रामस्थ आणि गोरखनाथ यांनाही निमंत्रण देण्यात आलं. त्यावेळी भैरवनाथाने वैष्णवीला पळवून नेण्याचा प्रयत्न केला , पण वैष्णवीने स्वत:ला सोडवून पुन्हा डोंगरात तपस्येला प्रारंभ केला. भैरवनाथ मात्र वैष्णवीला मिळवण्यासाठी तिचा पाठलाग करू लागला. भैरवनाथच्या सततच्या पाठलागामुळे देवींनी त्याला ठार करायंच ठरवलं.

वैष्णवी जिथे ध्यान करत होती तिथल्याच टेकडीवर देवींनी भैरवनाथाचं मस्तक छाटलं. मात्र त्याच वेळी भैरवनाथच्या येण्याचं मूळ उद्देश लक्षात आल्याने त्याला माफ केलं. त्यामुळेच वैष्णोदेवीला आलेल्यांची यात्रा भैरवनाथच्या दर्शनाशिवाय पूर्ण होत नाही. हे समजताच वैष्णवीने आपलं मानवी रूप सोडून तपस्या करण्याचं ठरवलं त्यामुळे त्या ठिकाणी साडेपाच फूटाच्या तीन पिंडी तयार झाल्या. त्यालाच आज श्री माता वैष्णोदेवी जी म्हटलं जातं.

Wednesday, October 17, 2007

आदिमाता 'जीवदानी'

ऐतिहासिक आणि पौराणिक महत्व असलेल्या विरारच्या जीवदानी देवीबद्दल अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. फार पूर्वी गडाच्या पायथ्याशी एका शेतकऱ्याच्या शेतात रोज एक गाय चरण्यासाठी येत असे. दिवसभर चरल्यानंतर ती डोंगरमाथ्यावर निघून जायची. त्या गायीबद्दल शेतकऱ्याच्या मनात कुतूहल जागं झालं. एकदा त्याने तिचा पाठलाग केला. डोंगरावरच्या एका मैदानात ती गाय थांबली आणि त्याचक्षणी तिथे एक तेजस्वी स्त्री प्रकट झाली. ती गाईची मालकीण असावी असं समजून शेतकऱ्यांने तिच्याकडे , आपल्या शेतात गाय चरते म्हणून पैशांची मागणी केली.

ती स्त्रीने शेतकऱ्याच्या हातावर पैसे ठेवत असतानाच शेतकऱ्यांने आपण अस्पृश्य असल्याचं सांगितलं. मला स्पर्श करू नकोस अशी विनंती त्याने करताक्षणीच ती तेजस्वी स्त्री नाहीशी झाली. शेतकरी अवाक् होऊन हे सर्व पाहत असतानाच त्याला दुसरा धक्का बसला. त्या गाईने मोठा हंबरडा फोडून कड्यावरून खोल दरीत स्वत:ला झोकून दिलं. गाईच्या बलिदानाचं रहस्य अजूनही गुलदस्त्यातच आहे. मात्र गाईने जीवाचं दान केलं म्हणून त्या डोंगराला ' जीवदानीचा डोंगर ' आणि डोंगरावर वास्तव करणारी आदिमाता ' जीवदानी ' म्हणून प्रसिद्ध झाली.

गाईने जिथून उडी घेतली तिथे एक ' तांदळा ' ( अष्टविनायकाच्या स्वरूपातलं मूतीर्चं रूप) ठेवला होता. भाविक त्याचीच पूजा करत. पूर्वी गुराखीच शिळेची पूजा करत. त्यानंतर बारकीबाय नावाची भक्त तिथे पूजा करू लागली. १९५६ मध्ये भक्तांनी देवीच्या मूतीर्ची प्राणप्रतिष्ठा केली. २३ फेब्रुवारी १९५६ रोजी बारकीबायच्या पुढाकाराने ट्रस्टची स्थापना झाली.

जीवदानीच्या पायथ्याशीच गणेश मंदिर आहे. तिथून गडाची उंची नऊशे फूट असून एकूण चौदाशे पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या दुतर्फा असलेल्या हिरव्यागार नयनरम्य वनराईतून गडावर चढायला सुरुवात केल्यानंतर थकवा जाणवतच नाही. मुख्य मंदिरात दगडातच गाभारा करून तिथे देवीची मूतीर् बसवण्यात आली आहे. उजव्या हाताने भक्तांना आशिर्वाद देणाऱ्या देवीचं दर्शन होताच भाविकांचा थकवा दूर होतो. मंदिराच्या परिसरात अनेक गुंफा असून त्या पांडवकालीन असल्याचं सांगितलं जातं. त्यात कालिकामाता , भैरवनाथ , बारोंडा देवीची मंदिरं आहेत. त्याच्या शेजारीच मानकुंड नावाची पाण्याची कुंडं आहेत. डोंगरावरून विरार आणि परिसराचं विहंगम दृश्य दिसतं. डोंगरावरून खाली उतरलं की पापडखिंड धरणाच्या निसर्गरम्य परिसरात जीवदानी देवीची बहिण बारोंडा देवीचं तसंच महादेवाचं मंदिर आहे. याठिकाणी महाशिवरात्रीला मोठी जत्रा भरते.

जीवदानीचा डोंगरावर १७ व्या शतकात जीवधन नावाचा गडकोट किल्ला होता. तटाचे काही कोरीव दगड भग्नावस्थेत आढळतात. मराठ्यांच्या ताब्यात असलेल्या किल्ल्यावर २७ मार्च १७३१ रोजी फिरंगी सरदाराने हल्ला केला होता. त्यावेळी गडावर फक्त शंभर मराठे होते. म्हणून मराठे किल्ला सोडून पळून गेले. त्यानंतर चिमाजीअप्पांनी आदेश दिल्यावर बरवाजी ताकपीर याने तीनशे सैनिकांसह हल्ला करून जीवधन गड ३१ मार्च १७३९ रोजी सर केला. टेहळणीसाठी मोक्याची जागा म्हणून किल्ल्याला महत्व होतं. पण किल्ला उपेक्षित राहिल्याने त्याचं अस्तित्वच संपुष्टात आलं.

मात्र जीवदानी देवीमुळे या परिसराला तीर्थस्थानाचा दर्जा मिळाला आहे. सध्या जीवदानी देवीची महती वाढल्याने इथे दरदिवशी हजारो भाविक गदीर् करतात. मंगळवार , शुक्रवारी इथे बरीच गदीर् होते. नवरात्रीचे नऊ दिवस गडावर उत्सव असतो. दसऱ्याच्या दिवशी तर एक लाखापेक्षा अधिक भाविकांची उपस्थिती असते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवीला अभिषेक , महावस्त्रालंकार परिधान केल्यानंतर घटस्थापना केली जाते. दुर्गाष्टमीला विविध पूजा केल्या जातात. विजयादशमीला महाभिषेक केला जातो. भाविकांच्या वाढत्या संख्येला आवश्यकतेनुसार मंदिराचा जीणोर्द्धार करून त्याचं विशाल मंदिरात रूपांतर करण्यात आलं आहे.

मंदिराच्या सभागृहाच्या नव्वद फूट खाली असलेल्या पठारावर सात मजली इमारत बांधण्यात आली आहे. त्यामुळे देवीच्या गाभाऱ्यासमोर पाच हजार फुटांचं सभागृह तयार झालं आहे. पायथ्यापासून गडावर चढण्यासाठी प्रशस्त पायऱ्या असून भाविकांना ऊनपावसांचा त्रास होऊ नये म्हणून पत्र्यांचं छत उभारण्यात आलं आहे. आता फनिक्युलर रोप रेलचा प्रकल्प लवकरच पूर्ण होणार आहे. त्यामुळे रेल्वेगाड्यांसारख्या डब्यात बसून गडावर जाण्याची व्यवस्था होईल.

- शशी करपे

देविमाहात्म्य - महाकाली

' महाकाली' ही एक तांत्रिक देवता आहे. आदिशक्तीच्या तम:प्रधान रौद रूपाला 'महाकाली' म्हणतात. ती दुष्टांचा संहार करण्यासाठी प्रकट होते, अशी समजूत आहे. मधु-कैटभ या दैत्यांचा नाश करण्यासाठी ती अवतरली असे 'देवी भागवता'त म्हटले आहे. शाक्त संप्रदायात 'महाकाली' या नावाने देवीची उपासना केली जाते. श्रीविद्यार्णव तंत्रात तिचे रूपध्यान वर्णन केलेले आहे.
कृष्णवर्ण, दशमुख, त्रिनेत्र, दशभुज, दशपाद असून खड्ग, शर, त्रिशूळ, गदा, चक्र, पाश इत्यादी आयुधे तिने धारण केली आहेत.
महाकाली भक्तांना वरदायिनी होते आणि त्यांचे संरक्षणही करते. दक्षिण भारतात ही ग्रामदेवता मानली जाते.

- दा. कृ. सोमण

Tuesday, October 16, 2007

जय माता दी..! (वैष्णोदेवी)

' प्यार से बोलो जय माती दी... ' म्हणत डोंगर चढून वैष्णोदेवीच्या दर्शनाला चालत जाणारी छोटी-छोटी मुलं पाहिली की आश्चर्य वाटतं. वैष्णोदेवीच्या डोंगराची चढण चढण्यासाठी अवघड खरी पण मनात अपार श्रद्धा असलेले जगभरातील कानाकोपऱ्यातून भाविक आनंदात मातेच्या दर्शनासाठी जातात.

जम्मू-काश्मीरमधल्या उधमपूर जिल्ह्यात कटरा नावाचं गाव आहे. तिथून जवळच असलेल्या त्रिकूट डोंगरावर वैष्णोदेवीचं स्थान आहे. तीन देवींच्या शक्तींचं रूप म्हणून वैष्णोदेवीचं आराधना केली जाते. डोंगरावर चढून जाणं मोठं अवघड काम आहे. सुमारे बारा ते पंधरा किमी अंतराचा चढ चढून जातात. काही जण घोड्यावरूनही यात्रा करतात. या यात्रेला ' माता का बुलावा ' असं म्हटलं जातं. एकदा का ही यात्रा पूर्ण केली तर मातेचा आशीर्वाद कायमचा तुमच्याबरोबर राहतो , अशी श्रद्धा आहे. माता वैष्णोदेवी वसलेल्या त्रिकूट पर्वताचा उल्लेख ऋग्वेदात आणि महाभारतातही आहे. माता वैष्णोदेवी ज्या गुहेत वसली आहे , ती हजारो वर्षांपूवीर्ची असावी , असं मत भूगोलतज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

वैष्णोदेवीच्या या स्थानाविषयीची एक कथा सांगितली जाते. असुरांचा विध्वंस करत असताना माता महाकाली , महालक्ष्मी आणि महासरस्वती एकेदिवशी एकत्र आल्या. त्यांनी आपलं तेज आणि शक्ती एकत्र करून एका रूपवान मुलीची निमिर्ती केली. मुलीने विचारलं , माझी निमिर्ती तुम्ही कशासाठी केलीत. तेव्हा , पृथ्वीवर जाऊन तिथे सर्वांना सुखसमाधान आणि न्याय मिळवून देण्यासाठी तुझी निमिर्ती केली आहे.

भारतातल्या दक्षिणेत राहणारा आमचे भक्त रत्नाकर आणि तुझी पत्नी यांच्या घरी तुझा जन्म होणार आहे. सर्वांना न्याय देण्यासाठी तुझ्या आध्यात्मिक बळाचा वापर कर. तुला आवश्यक शक्ती प्राप्त होताच तू विष्णूमध्ये विलीन होशील , असं देवींनी तिला सांगितलं.

काही काळानंतर रत्नाकर आणि त्याच्या पत्नीला संुदर कन्यारत्न प्राप्त झालं. तिचं नाव वैष्णवी ठेवलं. अगदी लहानपणापासूनच तिला अधिकाधिक ज्ञान मिळवण्याची इच्छा होती. तिला शिकवणाऱ्या शिक्षकांचं ज्ञानही तिच्यासमोर अपुरं पडत होतं.

ज्ञानप्राप्तीसाठी तिने तपस्येचा मार्ग पत्करला. ती घनदाट जंगलात पोहोचली. त्याच दरम्यान श्रीराम वनवासासाठी जंगलात आले. तेव्हा श्रीराम हे विष्णूचा अवतार आहेत , हे ओळखून तिने त्यांना मला आपल्यात सामावून घ्या , जेणेकरून ती सर्वाेच्च शक्तीचा एक भाग बनूशकेल , अशी इच्छा प्रकट केली. पण श्रीरामाने ही योग्य वेळ नाही , वनवास संपताच पुन्हा भेटीचं वचन दिलं. तिने त्यांना ओळखलं तर ते इच्छा अवश्य पूर्ण करतील , असं सांगितलं.

रामाने आपलं वचन पाळलं आणि रावणाबरोबरच युद्ध संपताच ते परतले ते एका वृद्धाच्या वेषात. त्यावेळी वैष्णवीने त्यांना ओळखलं नाही. याचाच अर्थात सवोर्च्च शक्तीपैकी एक होण्याची वेळ अजून आली नाही असं सांगून रामाने कलियुगात भेटू असं सांगितलं. काल्कीच्या रूपात रामाने अवतार घेतल्यावर ही भेट होणार होती. पण त्यासाठी त्रिकूट डोंगरावर आश्रम उभारून ध्यानधारणा करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार वैष्णवीने ध्यानाला प्रारंभ केला. वैष्णवीच्या तपस्येची माहिती अनेकांना समजली. तांत्रिक गोरखनाथाने तिची परीक्षा पाहायचं ठरवलं. त्यासाठी शिष्य भैरवनाथाला पाठवलं. भैरवनाथाने आश्रमाजवळ पाळत ठेवली.

त्यावेळी तपस्या करणारी वैष्णवी नेहमी आपल्याजवळ धनुष्यबाण बाळगत असल्याचं दिसलं. आणि तिच्या आसपास नेहमी माकडं आणि हिंस्त्र सिंह वावरत असल्याचं पाहिलं. मात्र तिच्या रूपाने त्याच्यावर मोहिनी घातली. त्याने तिच्याशी विवाह करायचं मनोमन ठरवून टाकलं. त्याचवेळी वैष्णवीच्या भक्तापैकी माता श्रीधरने भंडाऱ्याचं आयोजन केलं. त्यात सर्व ग्रामस्थ आणि गोरखनाथ यांनाही निमंत्रण देण्यात आलं. त्यावेळी भैरवनाथाने वैष्णवीला पळवून नेण्याचा प्रयत्न केला , पण वैष्णवीने स्वत:ला सोडवून पुन्हा डोंगरात तपस्येला प्रारंभ केला. भैरवनाथ मात्र वैष्णवीला मिळवण्यासाठी तिचा पाठलाग करू लागला. भैरवनाथच्या सततच्या पाठलागामुळे देवींनी त्याला ठार करायंच ठरवलं.

वैष्णवी जिथे ध्यान करत होती तिथल्याच टेकडीवर देवींनी भैरवनाथाचं मस्तक छाटलं. मात्र त्याच वेळी भैरवनाथच्या येण्याचं मूळ उद्देश लक्षात आल्याने त्याला माफ केलं. त्यामुळेच वैष्णोदेवीला आलेल्यांची यात्रा भैरवनाथच्या दर्शनाशिवाय पूर्ण होत नाही. हे समजताच वैष्णवीने आपलं मानवी रूप सोडून तपस्या करण्याचं ठरवलं त्यामुळे त्या ठिकाणी साडेपाच फूटाच्या तीन पिंडी तयार झाल्या. त्यालाच आज श्री माता वैष्णोदेवी जी म्हटलं जातं.

देविमाहात्म्य - उपांगललिता

' ललिता' या देवतेला भदा, पद्मा, शामला अशीही नावं आहेत. राधेचंच हे दुसरं रूप मानलं गेलं आहे. भंडारसुराचा नाश या देवतेने केला. ब्रह्मादेवाच्या यज्ञातून ही देवता प्रकट झाली. नैमिषारण्य आणि श्रीनगर इथे या देवतेची मंदिरे आहेत.
तिची मूर्ती चतुर्भुज आहे. तिच्या हातात धनुष्य, बाण, पाश आणि अंकुश ही आयुधं आहेत. ती नेहमी उभी असते.
हिला कालीची बहीण मानलं जाते. ललिता ही एक तांत्रिक देवता मानली जाते. तिची स्थूल, सूक्ष्म आणि पर अशी तीन रूपे मानली जातात. पूजादेखील कायिक, वाचिक आणि मानस अशा तीन प्रकाराने केली जाते. आश्विन शुक्ल पंचमीच्या दिवशी उपांगललिता व्रत केले जाते.हे व्रत काम्य म्हणजे विशिष्ट कामनेने केले जाते.

दा. कृ. सोमण

Monday, October 15, 2007

वणीची सप्तश्रृंगी

नाशिकच्या उत्तरेला प्रवास सुु केला की अनोख्या आकाराच्या डोंगरांची रांग लक्ष वेधून घेते. या डोंगररांगेतच एका गडावर एका प्रचंड दगडी गुहेत सप्तशृंगीचं स्वयंभू स्थान आहे. महाराष्ट्रातल्या साडेतीन शक्तीपीठांपैकी हे अर्ध पीठ. दक्षप्रजापतीने केलेल्या अपमानामुळे सतीने यज्ञकुंडात प्रवेश केला. तिचं शरीर खांद्यावर घेऊन क्रोधाने बेभान होऊन फिरणाऱ्या शिवाला रोखण्यासाठी, विष्णूने सुदर्शनचक्राने सतीच्या शरीराचे तुकडे केले. तिचे अवयव ज्या एकावन्न ठिकाणी गळून पडले ती शक्तिपीठं बनली, अशी कथा पुराणात आहे.

सप्तशृंगीच्या गडाच्या पायथ्याचं गाव नांदुरी. इथून घाटरस्ता सुरू होतो. दहा किलोमीटर अंतर पार केलं की आपण पठारावर येऊन पोहोचतो. समुदसपाटीपासून ४७०० फूटांवर हे साडेनऊ हेक्टरचं गावठाण आहे. पठारावर गेल्यावर समोर अंगावर येणारा सरळसोट कडा दिसतो. त्या पार्श्वभूमीवरचं शुभ्र मंदिर लक्ष वेधून घेतं. वर जाण्यासाठी बांधीव पायऱ्या आहेत. संपूर्ण मार्गावर छप्पर घातलंय. पाचशे पायऱ्या चढून गेल्यावर सुरेख बांधणीचं मंदिर आहे. मूळ पायऱ्यांचं बांधकाम कान्हेरे बंधू आणि पेशवेकालीन सरदार दाभाडे यांची पत्नी उमाबाईने यांनी केल्याच्या नोंदी आहेत. देवीची मूतीर् पूर्वाभिमुख भव्य आणि आणि अतिशय रेखीव आहे. आठ ते दहा फूट उंच, अष्टभूजायुक्त मूतीर्ची पूजा शिडीवर चढून करावी लागते.

नवरात्र उत्सवात प्रतिपदेला घटस्थापना झाल्यानंतर सकाळी महापूजा, दुपारी महानैवेद्य आणि संध्याकाळी आरतीचा कार्यक्रम होतो. नवमीच्या दिवशी शतचंडी याग केला जातो. मंदिराच्या मागे असलेल्या गुहेच्या माथ्यावर एक ३०० मीटर दुर्गम सुळका आहे. त्यावर निशाण चढवणं हा देवीच्या यात्रेतला हा नवरात्रीतला महत्त्वाचा कार्यक्रम असतो. याला पाचशे वर्षांची परंपरा आहे. नवरात्र संपल्यावर कोजागिरी पौणिर्मेला ५० ते ६० हजार भाविक गडावर येतात. अमरकंटकहून नर्मदा, उज्जैनहून क्षीप्रा, सुरतहून तापी, भीमाशंकरहून भीमा अशा देशभरातील नद्यांचं पाणी कावडीमधून घेऊन पायी प्रवास करत भाविक गडावर येतात. या पाण्याने देवीला अभिषेक घातला जातो. गेले पन्नास वर्षं ही परंपरा सुरू आहे.

नवरात्रीच्या उत्सवासाठी गडावर १४ ते १५ लाख भाविक येतात. वर अत्यंत कमी जागा असल्याने या गदीर्चं नियोजन करणं कौशल्याचं असतं. यात्रेत दुर्घटना होऊ नये म्हणून व्यवस्थापनाने अडीचशे सुरक्षा रक्षकांची व्यवस्था केली आहे. यावेळी अनेक जण संपूर्ण गडाची प्रदक्षिणा करतात. यावषीर् हा प्रदक्षिणेचा मार्ग काँक्रिटचा केला आहे . भक्तनिवासाच्या दोनशे खोल्यांमधून दोन हजार लोकांची सोय होऊ शकते. याशिवाय पाच हजार लोक बाहेर तंबू ठोकून राहतात. यात्रेसाठी येणाऱ्या प्रत्येकाला महाप्रसाद म्हणून जेवण देण्याचा उपक्रम यावषीर् राबवला जाणार आहे. नांदुरीवरून येणाऱ्या मार्गाचं रुंदीकरण करण्यात आलंय. यात्रेच्या काळात केवळ एसटी बसेस आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची वाहनं वर येऊ शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

नाशिकपासून ६५ किलोमिटरवर असलेलं हे तीर्थस्थान दिवसेंदिवस त्र्यंबकेश्वर, शिडीर्इतकंच भाविकांच्या आकर्षणाचं केंद बनत चाललं आहे.

- प्रगती बाणखेले

देविमाहात्म्य - भुवनेश्वरी

भुवनेश्वरी हे जगदंबेचं एक रूप आहे.

ही एक तांत्रिक देवता महणून प्रसिद्ध आहे.

भगवान विष्णूच्या देहातून ही देवी प्रकट झाली असे देवीभागवतात म्हटले आहे.

भुवनेश्वरी उगवत्या सूर्याप्रमाणे तेजस्वी, चंदमुकुट धारण करणारी, पुष्ट शरीर असलेली, त्रिनेत्री, सुस्मिता, कांतीमती, चतुर्भुज, पाशांकुशा धारण करणारी, वरद आणि अभय मुदा दाखवणारी आहे.

पंढरपूरक्षेत्री भुवनेश्वरीचे मंदिर आहे.

भुवनेश्वरीचे एक यंत्रही आहे. त्यावर तिची स्थापना करून तिची पूजा केली जाते.

ही देवी त्रिभुवनांवर सत्ता चालवणारी आहे. ती इच्छित फळ देते अशी समजूत आहे.

औदुंबर क्षेत्राच्या जवळ कृपणेच्या पैलतिरी भुवनेश्वरीचं मंदिर आहे.

दा. कृ. सोमण