Monday, October 29, 2007

पुणेकरांची श्रद्धास्थाने

मानाचा पहिला गणपती : कसबा गणपती
पुण्याची ग्रामदैवत म्हणून कसबा गणपतीला पहिला मान देण्यात आला आहे. पुण्यात कसबा गणपतीच्या प्रतिष्ठापनेपासूनच सार्वजनिक गणेशात्सवाला सुरूवात होते.

 

मानाचा दुसरा गणपती : तांबडी जोगेश्वरी

मानाचा तिसरा गणपती : गुरुजी तालीम

भाऊ रंगारी यांचा गणपती

 

वैद्य भाऊसाहेब रंगारी यांच्या गणपतीला खऱ्या अर्थाने पहिला सार्वजनिक गणपती म्हणावे लागेल . कृष्णाजीपंत खासगीवाले यांनी ग्वाल्हेर भेटीत तेथील सार्वजनिक गणेशोत्सव पाहिला . त्याने प्रेरित झालेल्या खासगीवाले यांना पुण्यातही असा उत्सव सुरू व्हावा , असे वाटले . त्यासाठी त्यांनी लोकमान्य टिळकांची भेट घेतली . शालूकर बोळात रंगारी यांच्या निवासस्थानी या सार्वजनिक गणेशोत्सवाचा पहिली मुहुर्तमेढ रोवली गेली . स्वातंत्र्याच्या चळवळीस वेग येण्यासाठी , तसेच प्रबोधनाचे व्यासपीठ म्हणून १८९२ मध्ये भाऊ रंगारी यांच्या गणपतीपासून सात दिवसांचा गणेशोत्सव सुरू केला . १९९३ पासून तो दहा दिवसांचा झाला .

 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती

याला कोतवाल चावडी गणपती किंवा बाहुलीचा हौद गणपती असे नाव होते . श्रीमंत दगडुशेठ हलवाई यांनी १८९३मध्ये स्वखर्चाने ही मूतीर् बसविली होती . तेव्हापासूनच नवसाला पावणारा देव अशी या गणरायाची ख्याती आहे . १९६७ मध्ये नवी मूतीर् बसवण्यात आली . कर्नाटकातील मूतिर्कार शंकरअप्पा आणि त्यांचे चिरंजीव नागेश शिल्पी यांनी ती तयार केली होती . या मूतीर्ला यंदा ४० वषेर् पूर्ण होत आहेत . दगडुशेठ गणपतीच्या दर्शनासाठी पुणे आणि राज्यातूनच नव्हे ; तर संपूर्ण देशातून भाविक येतात . या ट्रस्टचा वाषिर्क जमाखार्च सहा कोटी रुपयांच्या घरात जातो .

 

अखिल मंडई मंडळ गणपती

मंडई हे पुण्याचे मध्यवतीर् ठिकाण . हा गणपती म्हणजे मंडईत येणाऱ्या अठरापगड जातींच्या पुणेकरांच्या एकीचे प्रतीक मानले जाते . या मंडईतील गणपतीची स्थापनाही १८९३ सालीच झाली . लोकमान्य टिळकांची या मंडळासमोर गणेशोत्सवात अनेकदा व्याख्याने झाली . श्री शारदा आणि गजाननाची मूतीर् असलेला हा गणपती मानाच्या पाच गणपतींमध्ये नसला तरी सामान्य पुणेकरांच्या दृष्टीने त्याला महत्त्वाचे स्थान आहे .

 

विंचुरकर वाडा गणपती

लोकमान्य टिळकांनी ' केसरी ' संस्थेचा गणपती ते राहात असलेल्या विंचुरकर वाड्यात सुरू केला . कायदा विषयावर क्लासेस घेणाऱ्या टिळकांच्या या गणपतीला तेव्हा ' लॉ क्लासचा गणपती ' असेच नाव पडले होते . वाड्यातील पटांगणात मंडप टाकून त्यात हा उत्सव साजरा होऊ लागला .

No comments: