Tuesday, October 16, 2007

देविमाहात्म्य - उपांगललिता

' ललिता' या देवतेला भदा, पद्मा, शामला अशीही नावं आहेत. राधेचंच हे दुसरं रूप मानलं गेलं आहे. भंडारसुराचा नाश या देवतेने केला. ब्रह्मादेवाच्या यज्ञातून ही देवता प्रकट झाली. नैमिषारण्य आणि श्रीनगर इथे या देवतेची मंदिरे आहेत.
तिची मूर्ती चतुर्भुज आहे. तिच्या हातात धनुष्य, बाण, पाश आणि अंकुश ही आयुधं आहेत. ती नेहमी उभी असते.
हिला कालीची बहीण मानलं जाते. ललिता ही एक तांत्रिक देवता मानली जाते. तिची स्थूल, सूक्ष्म आणि पर अशी तीन रूपे मानली जातात. पूजादेखील कायिक, वाचिक आणि मानस अशा तीन प्रकाराने केली जाते. आश्विन शुक्ल पंचमीच्या दिवशी उपांगललिता व्रत केले जाते.हे व्रत काम्य म्हणजे विशिष्ट कामनेने केले जाते.

दा. कृ. सोमण

No comments: