Monday, October 29, 2007

देविमाहात्म्य - महाकाली

' महाकाली' ही एक तांत्रिक देवता आहे.
आदिशक्तीच्या तम:प्रधान रौद रूपाला 'महाकाली' म्हणतात.
ती दुष्टांचा संहार करण्यासाठी प्रकट होते, अशी समजूत आहे.
मधु-कैटभ या दैत्यांचा नाश करण्यासाठी ती अवतरली असे 'देवी भागवता'त म्हटले आहे.
शाक्त संप्रदायात 'महाकाली' या नावाने देवीची उपासना केली जाते.
श्रीविद्यार्णव तंत्रात तिचे रूपध्यान वर्णन केलेले आहे.
कृष्णवर्ण, दशमुख, त्रिनेत्र, दशभुज, दशपाद असून खड्ग, शर, त्रिशूळ, गदा, चक्र, पाश इत्यादी आयुधे तिने धारण केली आहेत.
महाकाली भक्तांना वरदायिनी होते आणि त्यांचे संरक्षणही करते.
दक्षिण भारतात ही ग्रामदेवता मानली जाते.

- दा. कृ. सोमण

No comments: