सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातल्या पश्चिमेस उंच डोंगराव असलेल्या मांढरदेव येथील श्री काळेश्वरी देवी ऊर्फ काळूबाई हे संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान अर्थात कुलदेवता आहे. समुदसपाटीपासून साडेचार हजार फूट उंचीवर असलेले हे दैवत जागृत स्थान असून भाविकांबरोबरच पर्यटकांच्या दृष्टीनेही सौंदर्याची खाण आहे. वाईपासून २० तर सातारापासून वाई मागेर् ५५ किलोमीटर अंतर असणाऱ्या या डोंगरावर जाण्यासाठी वाई व भोर या दोन्ही बाजूंनी पक्का घाट रस्ता आहे. रम्य गर्द वृक्षराईत या देवीचे पुरातन मंदीर असून ही देवी नवसाला पावते अशी भाविकांची भावना असल्याने दरवषीर् यात्रेप्रमाणेच नित्यनेम म्हणूनही लाखो भाविक येथे दर्शन व नवस चुकते करण्यासाठी येतात. दरवषीर् शाकंबरी पौणिर्मेला या देवीची मुख्य यात्रा भरते. त्याअगोदर दोन दिवस व पुढे दोन दिवस अशी एकूण ५ दिवसाची ही यात्रा साधारणपणे पौष मराठी महिन्यात तर जानेवारी या इंग्रजी महिन्यात भरते. जागर, छबिना, यात्रेच्या मुख्य दिवशी महाअभिषेक, पूजा व उत्तर यात्रा असे या यात्रेचे स्वरूप असून यात्रेशिवाय मंगळवार, शुक्रवार या देवीच्या वारी तसेच अमावास्या व पौणिर्मेला वर्षभर या ठिकाणी भाविकांची गदी होते.
निसर्गरम्य सृष्टीसौंदर्य लाभलेल्या या परिसरात वाईहून मांढरदेवकडे जाताना घाटातून पांडव गड, माळवा पठार, कृष्णा नदीवरील धोम धरण दृष्टीस पडते. भर पावसाळ्यात हिरव्यागार गालीचामध्ये हा डोंगर व त्यातून वाहणारे पाण्याचे धबधबे मनाला वेगळा आनंद देतात. मांढरदेव डोंगरावर या पठाराची लांबी १९ किलोमीटर असून पठाराच्या वायव्येस ६६० मीटर खोल दरी आहे. डोंगरावर भासणारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्ान् शासनाने धोम धरणातून पाणी आणून कायमचा संपवला आहे. मांढरदेव देवस्थान ट्रस्टचे वतीने देवालय परिसर विकासाबरोबरच गावात विविध शैक्षणिक, सामाजिक उपक्रम राबवले जातात. तसेच गावच्या विकास कामांनाही मोठा हातभार लावला जातो. देवस्थानला भाविकांकडून देणगीरूपात मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते. त्यातील ४० टक्के हिस्सा हा गावकामासाठी वापरला जातो. या परिसरात अनेक भाविक नवस फेडण्यासाठी येतात त्यात कोंबड्या, बकऱ्या मारणे, झाडांना खिळे ठोकणे हे प्रकार पूवीर् केले जात असत मात्र प्रशासनाने खंबीर भूमिका घेत या प्रथा मागील २-३ वर्षांपासून पूर्णत: बंद करत आणल्या आहेत. २५ जानेवारी २००५ रोजी यात्रेच्या मुख्य दिवशी येथे मोठी दुर्घटना घडून त्यात २९१ जणांना प्राण गमवावे लागले होते. यात्राकाळात दर्शनरांग व पायऱ्यांचे मजबूतीकरण, लोखंडी रेलींग, सुरक्षित कठडे, अशा कायमस्वरूपी सुरक्षा योजना येथे करण्यात आल्या आहेत. पशुहत्या व पशुसंहार हा पूर्णत: बंद करण्यात आला आहे. नवरात्री सणानिमित्त मंदीरास विद्युत रोषणाइं करण्यात आली असून मागील वर्षापासून ट्रस्टमार्फत अखंड नंदादीप योजनेमध्ये देवीच्या गाभाऱ्यात अखंड नंदादीप तेवत ठेवला जातो. यासाठी भाविकांनी दिलेल्या वर्गणीतून तेल खरेदी करून हे तेल नंदादीपात अर्पण केले जाते. मांढरदेव येथे बेकायदेशीर दारूविक्रीही बंद करण्यात आली आहे. समाजाच्या अंधश्रद्धेतून या इथे केले जाणारे चिठ्ठ्या, बिब्बे ठोकणे, भानामती, करणी करणे इ. प्रकारांचे मांढरदेव परिसरातून जवळजवळ उच्चाटन झाले आहे. प्रशासनाने २ वर्षांपासून सर्व यात्रा काळात मांढरदेव गडावर वाहनांसाठी पाकिर्ंग, दर्शनरांग, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था चांगल्या प्रकारे केली आहे. दुर्घटनेनंतर मंदीर परिसरात नारळ फोडणे, दीपमाळेत तेल घालण्यास मनाई करण्यात आली आहे. देवीच्या गाभाऱ्यात जावून दर्शन घेणाऱ्यांसाठी एक रांग तर दर्शन घेऊन खाली उतरण्यासाठी विशेष स्वतंत्र मार्ग करण्यात आला आहे. मंदीर परिसरात वृक्ष लागवड जोपासण्यासाठी लवकरच ट्रस्टमार्फत वन उभारले जाणार आहे.
काळेश्वरी देवीचे मंदीर हे पूर्वाभिमूख असून पुढे २ दीपमाळा आहेत. दगडी मंडप आणि गाभाऱ्यात ही स्वयंभू काळेश्वरीची मूतीर् आहे. सिंहावरून आलेली ही देवी येथे वसली आहे. डोक्यावर चांदीचा मुगुट आणि गळ्यात सोन्याचे लखलख दागिने असणाऱ्या देवीला पुरणावरणाचा नैवेद्य दाखविला जातो. स्वयंभूमूतीर्च्या पुढे अतिशय सुबक व रेखीव, देखण्या देवीचा चेहरा पाहताच भक्तांना एवढा उंच डोंगर चढून आल्याने जाणवणारा शिणवटा पार पळून जातो. अलीकडे कृष्णा तर पलीकडे नीटा नदीच्यामध्ये डोंगरावर वसलेल्या या देवीला कालिका, काळूबाई, काळूआई, काळेश्वरी अशा विविध नावांनी ओळखले जाते. भक्तांच्या नवसाला पावणारी, काळावर नियंत्रण करणारी ही देवी आणि तिच्या दर्शनाची आस लागलेले भक्त पूवीर् बोपडीर्, धावडी, पिराचीवाडी, गुंडेवाडी, लोहोम व भोर या गावांच्या बाजूने डोंगरकडा चढून दर्शनाला येत असत. आता पुण्याहून भोरमागेर् तर साताऱ्याहून वाईमागेर् दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांच्या संख्येत दरवषीर् वाढच होत आहे. अशा या मांढरदेव निवासीनी काळेश्वरीच्या दर्शनासाठी नवरात्रीनिमित्त भाविकांच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागत आहेत. नवरात्रीत पहाटे पूजाअर्चा होऊन नवी साडी व सोन्याचा मुखवटा, दागिने देवीला घातले जातात.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान - मांढरदेवची काळूबाई अखंडनंदादीप व जागरण नवरात्र केले जाते.
- अतुल देशपांडे, सातारा.
No comments:
Post a Comment