रेणुकादेवी जमदग्नीची पत्नी आणि परशुरामाची आई! प्राचीन काळी कान्यकुब्ज देशात इक्ष्वाकुवंशीय रेणू नावाचा राजा होता. या राजाने कन्याकामेष्टी यज्ञ केला. त्या यज्ञातून ही कन्या प्रकट झाली. म्हणून तिचे नाव रेणुका ठेवले. कामली हे तिचे पाळण्यातील नाव आहे.
भागीरथी क्षेत्री झालेल्या स्वयंवरात तिने जमदग्नीला वरले. माहूर हे रेणुकादेवीचे प्रमुख स्थान म्हणजे मूळपीठ मानतात. कर्नाटकात रेणुकादेवीची पूजा 'यल्लमा' या नावाने करतात.
हिला आदिशक्ती म्हणून मानले जाते. एकवीरा हेही रेणुका देवीचेच नाव आहे. रेणुकादेवी यमाई या नावानेही ओळखली जाते. नाशिक जिल्ह्यात चांदवड येथील डोंगरावर रेणुकादेवीचे मंदिर आहे. सौदत्ती व कार्ले येथील एकवीरेची स्थाने प्रसिद्ध आहेत. रेणुकेसंबंधीची बरीच माहिती रेणुका माहात्म्य या ग्रंथामध्ये सापडते.
- दा. कृ. सोमण
No comments:
Post a Comment