Monday, October 29, 2007

पुण्याची चतु:श्रृंगी

पुण्याच्या पश्चिमेला चार टेकड्यांमध्ये चतु:श्रुंगी मातेचे मंदिर वसलेलं आहे. श्रुंग म्हणजे टेकडी. म्हणूनच हे मंदिर चतु:श्रुंगी या नावाने प्रसिद्ध झाले आहे. चतु:श्रुंगी मंदिराच्या स्थापनेमागे एक कथा प्रचलित आहे. २५० वर्षांपूर्वी दुर्लभशेठ नावाचे सप्तश्रुंगी मातेचे निस्सिम भक्त होऊन गेले. दरवर्षी सप्त:श्रुंगी मातेच्या दर्शनासाठी ते वनीला जात असत. पण वयोमानानुसार त्यांना नियमित जाणे अशक्य होऊ लागले. त्यांच्या भक्तीला प्रसन्न होऊन देवीने त्यांना स्वप्नामध्ये ' माझे रूप तुला पश्चिम दिशेला मिळेल. तिथे माझी प्रतिष्ठापना कर ,' असा दृष्टांत दिला.

आज हे मंदिर गर्द झाडीमध्ये आहे. सुमारे ३.५ एकर परिसरात ते बांधण्यात आले आहे. साधारणत: ४५० फुट उंचीवरील या मंदिरात पोहचण्यासाठी १५० पायऱ्या सर कराव्या लागतात. देवीच्या मंदिरात प्रवेश करण्यापूवीर् डाव्या बाजूला गणपतीचे मंदिर बांधण्यात आले आहे. तसेच देवीच्या मंदिरात महादेव , तुळजाभवानी , सप्तश्रुंगी माता आणि खरजाई देवीची लहान मंदिरे आहेत. गाभाऱ्यातील शांत वातावरणामुळे मन प्रसन्न होते.

दरवषीर् या मंदिरात नवरात्र मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जाते. संपूर्ण भारतातून तसेच परदेशांतूनही एक लाखाहूून आधिक भाविक येथे दर्शनासाठी गदीर् करतात. मंदिराचे विश्वस्त सामाजिक बांधिलकीचे भान

ठेवून नवरात्र जागवण्याचा प्रयत्न करत असतात. या देवीस्थानाचे वैशिष्ट्य म्हणजे निर्माल्यापासून गांडूळ खत तयार करण्यासाठी मंदिराच्या परिसरामध्ये ' इनोरा ' या पर्यावरणवादी संस्थेने प्रकल्प चालू केला आहे. नवरात्रीमध्येच नव्हे , तर पूर्ण वर्षभर या प्रकल्पातून खत तयार करण्यात येते.

नवरात्रीच्या पहिल्या माळेला देवीला अभिषेक करण्यात येतो. त्यानंतर रोज दिवसातून दोनदा आरती केली जाते. कोजागिरी पौणिर्मेपर्यंत मंदिराच्या परिसरात मोठ्या प्रमाणात जत्रा भरवण्यात येते. जत्रेमध्ये विविध प्रकारचे खाद्यपदार्थ , सांैदर्यप्रसाधने , खेळणी यांचे स्टॉल्स असतात. तसेच मनोरंजनासाठी जाएण्ट व्हील , धडकगाडी यांसारखी साधने असतात. या सर्वच गोष्टी भाविकांना आकषिर्त करतात. यंदा या जत्रेमध्ये ७०पेक्षा आधिक स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. भाविक आणि स्टॉलधारकांच्या सुरक्षिततेसाठी विश्वस्त मंडळाने दोन कोटी रुपयांचा विमा उतरवला आहे. गैरप्रकार घडू नयेत यासाठी दक्षता म्हणून मंदिरपरिसरात शंभराहून आधिक पोलिस , होमगार्ड आणि स्वयंसेवक तैनात करण्यात आले आहेत. वृद्ध भाविकांना गाभाऱ्याचे दर्शन घेता यावे यासाठी मंदिराच्या पायथ्याशी सीसीटीव्हीची व्यवस्था करण्यात आली आहे.

मंदिराच्या गाभाऱ्यात ३३ किलो चांदीची देवीची मूतीर् आहे. ती सोन्याच्या दागिन्यांनी सजविलेली आहे. दसऱ्याला सीमोल्लंघनासाठी १९ किलो चांदीच्या पालखीमधून देवीचा छबीना निघतो. या भव्य मिरवणुकीमध्ये असंख्य महिला देवीला औक्षण करतात. सामाजिक बांधिलकीची जाणीव म्हणून गुलाल न उधळता आणि फटाके न वाजवता मिरवणूक शांत वातावरणात पार पाडली जाते. मंदिराला प्रकाशझोतात आणण्यासाठी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष दत्ता गायकवाड , कार्यकारी अध्यक्ष नंदकुमार अनगळ आणि माणिक बिर्ला , अरुण अनगळ आदी सदस्यांचा सिंहाचा वाटा आहे.

- करुणा गोसावी

No comments: