Saturday, October 13, 2007

करवीरनिवासिनी आई अंबाबाई

[ Saturday, October 13, 2007 03:41:04 am]' आई उदे गं अंबाबाई' असा जिचा गजर केला जातो ती अंबाबाई, करवीरनगरीत वसली आहे. कोल्हापूरचं दुसरं नाव करवीर. सहसा एखाद्या देवाच्या किंवा देवीच्या नावावरून त्या तीर्थाची ओळख होत असते. पण कोल्हापूर आणि करवीर ही नावं राक्षसांच्या नावावरून पडली आहेत.

कोल्हापूरात मध्यवतीर् वसलेलं तीन गाभाऱ्यांच्या रचनेचं अंबाबाईचं पश्चिमाभिमुख मंदिर हेमाडपंथी आहे. चारही बाजूने मंदिरात प्रवेश करता येतो. महाद्वारातून थेट मूतीर्चं दर्शन घडतं. मंदिराबाहेरील खांबांवर केलेलं कोरीव काम अत्यंत रेखीव आहे. मंदिरातल्या प्राचीन शिलालेखांवरून ते अठराशे वर्षांपूवीर्चं असल्याचा अंदाज आहे. शालिवाहन घराण्याचा राजा कर्णदेव याने हे मंदिर बांधलं. त्यानंतर हळुहळू परिसरात जवळपास तीस ते पस्तीस मंदिरं बांधली गेली.

मोठी शिल्पं तयार करून सांधे जोडताना चुना न वापरता मंदिर उभारण्यात आलं. श्री महालक्ष्मीची मूतीर् तीन फूट उंच असून चतुर्भूज आहे. या स्थानाविषयी काही कथा आहेत. विष्णूनाभीतून उत्पन्न झालेल्या ब्रह्मााने तमोगुणयुक्त असे गय, लवण आणि कोल्ह असे तीन मानसपुत्र निर्माण केले. ज्येष्ठ गय याने ब्रह्मााची उपासना करून माझ्या देहाला देवपितर तीर्थाहून शुद्धी असावी, असा वर मागितला. बह्मााने तथास्तु म्हटल्यावर गय आपल्या स्पर्शाने पापी लोकांचा उद्धार करायला लागला. यमाने तक्रार केली. तेव्हा देवांनी यज्ञासाठी त्याचा देह मागितला होता.

केशी राक्षसाचा मुलगा कोल्हासुराने अनाचार माजवले होते. देवांनी प्रार्थना केल्यामुळे श्री महालक्ष्मीने त्याच्या वधाची तयारी केली. दोघांचं युद्ध झालं. महालक्ष्मीने बह्माास्त्राने त्याचं मस्तक उडवलं. त्याचं धड जितीचा ओढा इथे पडलं. त्याच्या मुखातून दिव्य तेज थेट महालक्ष्मीच्या मुखात शिरलं आणि त्याच्या धडाचा कोहळा झाला. अश्विन पंचमीस त्याचा वध झाला. त्याआधी त्याने या क्षेत्रास असलेली कोल्हासूर आणि करवीर ही नावं तशीच राहावीत, असा वर मागितला. काळाच्या ओघात कोल्हासूरचं कोल्हापूर झालं, पण करवीर हे नाव कायम राहिलं.

कोल्हासूराच्या वधानंतर आनंदोत्सव समारंभात देवदेवता, ऋषीमुनी आले होते. त्याच वेळी त्र्यंबुली देवीला आमंत्रण न मिळाल्याचं आठवताच श्री महालक्ष्मी तात्काळ उठली. श्री भैरव आणि इतर देवतांसह त्र्यंबुलीस पूवेर्कडच्या टेकडीवर भेटायला गेली. त्र्यंबुली रुसली होती. तिची समजूत काढून तिला येण्याची विनंती केली. तेव्हा तू करवीरक्षेत्री जा. माझा राग गेला, पण मी येणार नाही. असं सांगितलं. त्यामुळेच त्र्यंबुलीपंचमी देवी मंदिर सोडून टेकडीवरच्या टेंबलाईच्या देवळात गेली. पंचमीला त्र्यंबोली यात्रेचा सोहळा पाहण्यासारखा असतो. याला टेंबलाई किंवा ललितापंचमी म्हटलं जातं. महालक्ष्मी मंदिरापासून जवळच असलेल्या टेकडीवर टेंबलाई देवीचं मंदिर आहे. अंबाबाईकडे पाठ करून टेकडीवर बसलेल्या टेंबलाईचा रुसवा काढण्यासाठी अंबाबाई दरवषीर् फुलांनी सजवलेल्या पालखीतून वाजतगाजत टेकडीवर जाते. वाटेत ठिकठिकाणी पूजा होते. दोन्ही देवता एकमेकींना भेटतात आणि देवी मंदिरात परतते. अत्यंत भावनिक असा हा सोहळा दरवषीर् पंचमीला होतो. तिथे कोहळा फोडण्याचाही विधी पार पडतो.

अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून म्हणजेच घटस्थापनेपासूनचा उत्सव मोठा असतो. तोफेची सलामी ऐकताच 'देवीबसल्याची' वदीर् गावातल्यांना मिळते. प्रतिपदेला बैठीपूजा, द्वितीयेला खडीपूजा, त्र्यंबोलीपंचमी दिवशी हत्तीच्या अंबारीतील, रथारूढ पूजा, मयुरारूढ पूजा, अष्टमीला महिषासूरमदिर्नी, सिंहवासिनी अशा रूपातील देवीच्या पूजेचा हा अवर्णनीय सोहळा असतो.

अष्टमीला घागरी फुंकण्याची पूजा बांधली जाते. त्या मध्यरात्रीपर्यंत धामिर्क सोहळे होत राहतात. नवरात्रीच्या शेवटच्या दिवशीही होमहवन, पूजा होत असते. या दिवशी शस्त्रपूजा होते. तिरुपतीची रुसून आलेली पहिली पत्नी म्हणून महालक्ष्मी कोल्हापुरात आल्याची कथाही सांगितली जाते. त्यामुळे तिरुपती मंदिराकडून आलेला शालू त्या दिवशी नेसवला जातो.

दसऱ्याच्या दिवशी देवी हत्तीच्या अंबारीत बसते. तिला अलंकारांनी सुशोभित केलं जातं. संध्याकाळी पाच वाजता तोफेची सलामी मिळाल्यावर देवीची पालखी निघते. दसरा चौकात शिलंगणाचा होणारा हा सोहळा अत्यंत देखणा असतो. तिथे सोनं लुटण्यासाठी गदीर् होते. देवीची पालखी लवाजम्यासह परत मंदिराकडे निघते.

- अपर्णा पाटील

No comments: