Saturday, October 13, 2007

देविमाहात्म्य (चामुंडा)

[ Saturday, October 13, 2007 03:39:48 am]

ही सप्तमातृकांपैकी एक शक्तीदेवता आहे.

ही देवता अत्यंत पराक्रमी असल्याने कोणत्याही संकटाच्या प्रसंगी देव हिला शरण जातात.

ब्रह्मा-विष्णू-महेशांनी आपल्या मुखातून एक तेजोराशी निर्माण केली, तीच चामुंडा होय.

सर्व देवांनी तिला आयुधे दिली. चामुंडेने महिषासुराचा वध केला.

चामुंडादेवी भक्तांना शौर्य देते अशी समजूत आहे.

चामुंडेची एक अष्टभुजा मूर्ती तिरुच्चीगोडू येथे आहे.

- दा. कृ. सोमण

No comments: