Friday, October 12, 2007

नवरात्र घटस्थापनेचे महत्त्व

[ Saturday, October 13, 2007 04:14:10 am]

राक्षसाचा नि:पात करण्यासाठी देवीने जिथे रुद रूप धारण केले, अशी ५१ पीठे देशात असून त्यातील साडेतीन पीठे महाराष्ट्रात तुळजापूर, कोल्हापूर, वणी आणि माहूरगड येथे आहेत.

याकाळात नवमीपर्यंत दररोज सप्तशतीचा पाठ, दुर्गापाठ किंवा देवी भागवताचे वाचन केले जाते. या नऊ दिवसांत उपवास केला जातो. सुवासिनींची ओटी भरली जाते. देवीची पूजा करताना पूजा केलेला टाक वापरला जातो. कुळधर्म म्हणून काही ठिकाणी अष्टमीला घागरी फुंकण्याचा कार्यक्रमही होतो.

नवरात्राचे घट बसताना घरी परडीमध्ये माती घालून त्यामध्ये तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी आणि सातू पेरले जातात. त्यांना दररोज पाणी घातले जाते. मातीचे घट बसवून त्यास पहिल्या दिवशी विड्याच्या पानाची माळ घातली जाते, तर नंतर रोज तिळाच्या फुलांची माळ नऊ दिवस घालायची, असा प्रघात आहे. पाचव्या, सातव्या दिवशी देवीला तोरण वाहाण्याची प्रथाही आहे.

No comments: