[ Monday, September 10, 2007 03:57:36 am]
पोळा आणि पिठोरी अमावस्येचा योगायोग आज एकाच दिवशी आला आहे. मुलांना दीर्घायुष्य मिळावे यासाठी पिठोरी अमावस्येचे व्रत करण्याची प्रथा आहे. सायंकाळी स्नान करून सर्वतोभद मंडलावर आठ कलश स्थापन करून त्यावर पूर्णपात्रे ठेऊन ब्राह्मी, माहेश्वरी या शक्तींची पूजा करतात. तांदुळाच्या राशीवर चौसष्ठ योगिनींना आवाहन दिले जाते. पूर्वी या पूजेसाठी पिठाच्या मूर्ती तयार केल्या जात असे. तसेच पिठाच्या पदार्थांचाच नैवेद्य दाखवला जात असे, म्हणून या तिथीला पिठोरी अमावस्या म्हणतात. तसेच बैलाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज अनेक गावात शेतकरी बैलपोळा साजरा करतात. बैलांना सजवून पुरणपोळ्यांचा नैवेद्य दाखवला जातो.
- दा.कृ. सोमण
No comments:
Post a Comment