[ Monday, September 03, 2007 12:45:24 am]
- दा. कृ. सोमण
आज श्रावण कृष्णाष्टमी. म्हणजेच भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव. श्रीकृष्ण हा भगवान विष्णूचा अवतार आहे.
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्, धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे.
सज्जनांच्या संरक्षणासाठी आणि दुर्जनांचा नाश करण्यासाठी तसेच धर्मसंस्थापनासाठी मी प्रत्येक युगामध्ये जन्म घेणार आहे, असे श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये म्हटले आहे. युद्धाच्यावेळी कृष्णाने अर्जुनास कर्तव्यासंबंधी अमूल्य उपदेश केला, हा उपदेश म्हणजेच भगवद्गीता होय. या उपदेशामुळे श्रीकृष्णाला धर्मसंस्थापक मानले जाते.
संपूर्ण भारतात श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जातो. मुख्यत: वृंदावन, गोकुळ, मथुरा, द्वारका आणि जगन्नाथपुरी येथे हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आज दिवसभर उपवास करून मध्यरात्री जन्मोत्सव साजरा करून उपवास सोडायचा असतो.
No comments:
Post a Comment