Monday, September 3, 2007

द्विशतकी परंपरेचं काशी विश्वेश्वर

[ Monday, September 03, 2007 12:41:08 am]

- रेश्मा मोरजकर
माटुंगा पश्चिमेला सोमवंशीय क्षत्रिय ज्ञातीचं आणि सध्या दादोबा जगनाथ रिलीजस ट्रस्टच्या मालकीचं ' श्री काशी विश्वेश्वर देवालय ' आहे. १७८३ मध्ये कै. नारायण दाजी मंत्री यांनी या शिवालयाची स्थापना केली.

या वर्षी मंदिराच्या स्थापनेला सव्वा दोनशे वर्षं पूर्ण होत आहेत. महिम्न स्तोत्रात महादेवाचं वर्णन ' स्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाच्चा सहचरा ' असं आहे , याचा अर्थ ' शंकराला स्मशान , तळी किंवा नदीकिनारी वास्तव्य करायला आवडतं ,' असा आहे. त्यामुळे बरीचशी शंकराची स्थानं ही नदीकाठी किंवा स्मशानाच्या जवळ असतात. माहीमच्या गजबजलेल्या ठिकाणी हे स्वयंभू शंकराचं स्थान कसं काय वसलंय , हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. मागच्या दोनशे वर्षांत मुंबई खूप झपाट्याने बदललीय आणि तिच्या बदलेल्या रूपाचा परिणाम या शिवालयावरही झाला आहे. पूवीर् या शिवालयाच्या जवळपास सात तळी होती. त्यामुळे या परिसरालाट ' गोपी टँक ' ओळखल मिळालीय. तसं पाहता वर्षभर देवळात सायंकाळी साडेचार ते सहा या वेळात अनेक कीर्तनकारांची कीर्तनं आयोजित केली जातात. चातुर्मासामध्ये त्यात थोडासा फेरफार होऊन साडेतीन ते साडेचार या वेळात प्रवचनांचं आयोजन करण्यात येतं. श्रावणी सोमवार , महाशिवरात्र , माघी पौणिर्मेला देवदर्शनासाठी भाविकांची गदीर् लोटते. विपदानिवारणासाठी महामृत्युंजय जप , लघुरुद यासारख्या पूजा केल्या जातात. सकाळ आणि सायंकाळ साडेसातला सामुहिक आरती होते. ' काळभैरव ' हा शंकराचा अवतार मानला जातो. श्री शंकराचार्यांनी ' कालभैरवाष्टका ' त सांगितल्याप्रमाणे प्रत्यक्ष काळसुद्धा भैरव नामक या दैत्यावताराला घाबरतो , म्हणून तो काळभैरव. बाहेरची बाधा किंवा पिशाच बाधा दूर होण्यासाठी , दारूचं व्यसन सुटण्यासाठी काळभैरवाची नारळ ठेवून प्रार्थना केली जाते. या काळभैरवाची मूतीर् महाराष्ट्रात फारशी आढळत नाही. काशी विश्वेश्वराच्या देवळात गंडकी नदीतल्या शाळीग्राम पाषाणापासून घडवलेली मूतीर् आहे. या काळभैरवाच्या दर्शनासाठी बुधवार , रविवार आणि अमावस्येला भाविक गदीर् करतात. या मूतीर्व्यतिरिक्त मंदिरातील सभागृहाच्या दर्शनी भागात श्रीशंकर-पार्वती आणि बालगणेशाचं शिल्प आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ भारतातील बारा ज्योतिलिर्ंगांची कलाकृती आणि दीपमाळ आहे. या देवालयाच्या द्विशतक रजत महोत्सवाची सुरुवात १ फेब्रुवारी २००७ रोजी गणेशयागाने केली गेली , तर १९ फेब्रुवारी २००८ च्या माघी पौणिर्मेला रुदस्वाहाने या महोत्सवाची सांगता होणार आहे. दोन शतकाची परंपरा असलेलं हे काशी विश्वेश्वराचं देऊळ बांधल्यापासून आहे तसंच आहे. केवळ दर दोन एक वर्षांनी रंगरंगोटी करण्यात येते.

No comments: