[ Wednesday, August 29, 2007 11:05:18 pm]
- दा.कृ.सोमण
आज बृहस्पती पूजन करण्याचा दिवस. बुध बृहस्पतीची कहाणी बरंच काही सांगून जाते. एका राजाला सात सुना होत्या. त्या कधीही भिक्षेकऱ्यांना भिक्षा घालत नसत. अखेर त्यांना दारिद्य आलं. दारिद्यावस्थेत भिक्षेकऱ्याची अन्नाची गरज समजल्याने त्यांना आपली चूक उमगली. श्रावणातील दर बुधवारी आणि गुरुवारी त्या अन्नदान करून अतिथींना सन्मान देऊ लागल्या. त्यामुळे त्यांना गतवैभव पुन्हा प्राप्त झालं. आधुनिक काळातही अन्नवान पुण्यकारक आहे. आपण समाजाचं काही देणं लागतो, ही भावना प्रत्येकामध्ये रुजली पाहिजे. परिचीत अथवा अपरिचीत व्यक्तींना वैयक्तिक आयुष्यात समस्यांना सामोरं जावं लागलं तर त्यांना साहाय्य करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. हीच भूमिका नैसगिर्क संकटाच्या वेळीही घेणं आवश्यक आहे, याची जाणीव बुध बृहस्पतीच्या कहाणीतून होते.
No comments:
Post a Comment