Monday, August 27, 2007

नारळी पौर्णिमा

आजचा सायंव्यापिनी श्रावणी पौर्णिमेचा दिवस नारळी पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. पावसाळ्यात रौद रूप धारण केलेला समुद श्रावणी पौर्णिमेपासून शांत होण्यास सुरूवात होते. कोळी लोकांचे जीवन सागरी मासेमारीवर अवलंबून असल्याने या दिवशी नवीन वस्त्रालंकार घालून ढोल, ताशा, सनई या वाद्यांच्या आवाजात समुद देवता वरूणराजाची पूजा केली जाते. आणि आजपासून पुन्हा मासेसारीला सुरूवात होते. समुदकिनाऱ्याचे फळ म्हणून श्रीफळाला शुभफळ मानतात. समुदाला श्रीफळ अर्पण करून प्रार्थना करण्याची प्रथा असल्याने या सणाला नारळी पौर्णिमा म्हणतात.

No comments: