श्रावणातल्या गुरूवारी बृहस्पती पूजन करण्याची प्रथा आहे. बृहस्पती म्हणजे गुरू ग्रह. संस्कृत भाषेत गुरूचे बृहत: महत: अस्य जगत: उदकस्य वा पात्रा रक्षिता असे वर्णन केले आले. म्हणजेच या महान जगताचे किंवा जलाचे रक्षण करणारा बृहस्पती आहे. ऋग्वेदात बृहस्पतीचा देवांचा पिता असाही उल्लेख केला आहे. बृहती म्हणजे वाणी, तिचा पती तो बृहस्पती होय. बृहस्पती हा सूक्तदष्टा होता. त्याने वाणीचं प्रथम महत्त्व जाणलं होतं.
- दा.कृ.सोमण
Thursday, August 23, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment