शब्दकथा : मंगळागौर
[ Sunday, August 12, 2007 08:30:52 pm]
श्रावणाच्या निमित्ताने अनेक शब्द कानावर पडतात, त्यांचे अर्थ आणि संदर्भ या सदरातून...
मंगळागौर
नवीन लग्न झालेल्या तरुणींनी श्रावणातल्या प्रत्येक मंगळवारी गौरीची पूजा करावयची, म्हणजे मंगळागौर. लग्नानंतर पहिली पाच वर्षे हे व्रत करतात. त्यातले पहिले वर्ष जास्त मौजेचे. या दिवशी दुपारचे भोजन सुवासिनीने मैत्रिणींबरोबर करायचे असते, पण एकही अक्षर न बोलता!
त्याचे उट्टे रात्री काढता येते. कारण मंगळागौरीची खरी गंमत असते रात्र जागवणाऱ्या खेळांमध्ये. मिळतील तेवढ्या फुला, पानांनी सजवलेली, पूजा केलेली गौर म्हणजे गौरी बुधवारी सकाळी विसर्जन करतात.
- अक्षरदास
Monday, August 13, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment