Monday, August 13, 2007

शिवामूठ

दिनमाहात्म्य
[ Sunday, August 12, 2007 08:31:34 pm]
आजपासून श्रावण महिना सुरू होतोय. म्हणजेच ग्रीष्मऋतू संपून वर्षाऋतूला प्रारंभ होतोय. श्रावण महिना पूर्वी नभस या नावाने ओळखला जात असे. जेव्हा चांदमासाचे आकाशाशी नातं जोडलं गेलं त्या दिवसापासून हा महिना श्रावण महिना म्हणून ओळखला जाऊ लागला. या महिन्यात श्रवण नक्षत्र रात्रीच्या प्रारंभी पूवेर्ला उगवतं आणि रात्रभर आकाशात राहून पश्चिम क्षितिजावर मावळतं. तसंच या महिन्याच्या पौणिर्मेला चंद श्रवण नक्षत्राला सोबत करतो.
यावर्षी श्रावणाची सुरुवात सोमवारपासूनच होत आहे. श्रावणी सोमवारी एकभुक्त नक्तव्रत करण्याची प्रथा आहे. दिवसभर उपवास करून सूर्यास्तानंतर तीन घटकांनी म्हणजे एक तास बारा मिनिटांनी भोजन करायचे आहे. विवाहानंतर पहिले पाच वर्षं शिवमंदिरात जाऊन शिवामूठ वाहतात. आज तांदुळाची शिवामूठ वाहायची आहे.
- दा. कृ.सोमण

No comments: