Wednesday, September 5, 2007

गोपाळकाला

श्रीकृष्ण जयंतीच्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाला साजरा करण्याचा प्रघात आहे. लोणी आणि दही हे श्रीकृष्णाचे आवडते पदार्थ. श्रीकृष्णाचा आपल्या सवंगड्यांसोबत गोपिकांच्या हंडीतील लोणी पळवण्याचा दिनक्रम ठरलेला असायचा. या खेळातून बाळगोपाळ भरपूर आनंद घेत असत. श्रीकृष्णाच्या या खोडकरपणाचा प्रत्यय येण्यासाठी आधुनिक श्रीकृष्ण मानवी मनोरे रचून दहिहंडी फोडतात. या सांस्कृतिक महोत्सवामध्ये सर्वजण जातपात विसरून आनंदप्राप्तीसाठी सहभागी होतात.

No comments: