Monday, August 20, 2007

खुलभर दुधाची कहाणी

खुलभर दुधाची कहाणी
- दा.कृ. सोमण
आज श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन तिळाची शिवामूठ वाहायची असते. तसेच आजच्या दिवशी खुलभर दुधाची कहाणी वाचण्याचा प्रघात आहे. या गोष्टीतून मिळणारे तत्त्वज्ञान वर्तमानातही उद्बोधक वाटते. आटपाट नगरातील राजाने मंदिरातील गाभारा दुधाने भरायचा आहे तेव्हा गावकऱ्यांनी घरचं सर्व दूध गाभाऱ्यात आणून द्यावं अशी आज्ञा केली. सर्व गावकऱ्यांनी राजाच्या आज्ञेचं पालन करूनही गाभारा भरला नाही. दुपारी एक चमत्कार झाला. एका म्हातारीने गाई वासरांना चारा घातला, महान मुलांना दूध दिलं आणि मग खुलभर दूध मंदिरात दिलं. आश्चर्य म्हणजे तिच्या खुलभर दुधाने गाभारा भरला. राजाला या चमत्काराचे उत्तर देताना म्हातारी म्हणाली की, तुझ्या आज्ञेने वासरांचे, लहान मुलांचे आत्मे तळमळले. म्हणून गाभारा भरला नव्हता. मी आधी लहान मुले, वासरांना तृप्त केले आणि मग गाभारा भरला.

No comments: