Tuesday, August 28, 2007

रक्षाबंधन

[ Monday, August 27, 2007 11:28:55 pm]

- दा. कृ. सोमण
आज सूयोर्दयापासून दोन तास चोवीस मिनिटांपेक्षा जास्त पौणिर्मा असल्याने दुपारपर्यंत रक्षाबंधन करायचे आहे. रक्षाबंधनाला वैदिक कथांचा इतिहास आहे. एकदा इंदाच्या राणीने इंदाच्या हातात दोरा बांधला. या दोऱ्याच्या सार्मथ्याने इंदाने वृत्त नावाच्या महाबलाढ्य राक्षसावर मात केली होती. झेेलम नदीच्या किनारी सावित्रीने सिकंदराच्या हातात राखी बांधली, त्यामुळे त्यांचे बहिणभावाचे नाते जुळले. पुढे सिकंदरने सावित्रीचा भाऊ पोरसवर जेव्हा हल्ला केला तेव्हा सावित्रीने सिकंदरला आपल्या नात्याची आठवण करून दिली. जोडलेल्या नात्याला जागून सिकंदरने दोघांची माफी मागून पोरसला त्याचे राज्य परत केले. या कथांबरोबरच चितोडची राणी कर्मवती आणि दिल्लीचा मोगल बादशहा हुमायून यांच्याही बंधुप्रेमाची कहाणी प्रसिद्ध आहे. आधुनिक काळातही रक्षाबंधनाचे महत्त्व वाढत आहे. राखी म्हणजे केवळ सूताचा दोरा नसून स्नेह, माया, जिव्हाळा याचे प्रतिक आहे. दुभंगलेली मने जोडणारे एक साधन आहे.

No comments: