[ Tuesday, August 28, 2007 11:31:40 pm]
- दा. कृ. सोमण
आज श्रावणी बुधवार! आजचा दिवस हा बुधपूजनाचा. तसेच आजपासून श्रावण कृष्णपक्षाचा आरंभ होतोय.उत्तर हिंदुस्थानात महिने पौर्णिंमांत मानले जातात. म्हणजेच तिथं चांदमहिना कृष्णप्रतिपदेपासून सुरू होतो आणि तो शुक्ल पौर्णिमेला संपतो. त्यामुळे त्या पद्धतीत महिन्याचा कृष्णपक्ष अगोदर येतो आणि नंतर शुक्लपक्ष. महाराष्ट्र आणि दक्षिणभारतात अमांत महिने मानले जातात. म्हणजे चांदमहिन्याचा प्रारंभ शुक्ल प्रतिपदेपासून होतो आणि कृष्ण अमावस्येला संपतो. आजपासून श्रावण कृष्णपक्ष सुरू होत आहे. त्यामुळे उत्तर हिंदुस्थानात श्रावण महिना कालच संपला, आपल्या्कडे मात्र अजून पंधरा दिवस श्रावण आहे. पंचागांत कालगणनेमध्ये सुसूत्रता यावी म्हणून प्रयत्न चालू आहेत. सध्यातरी विविधतेतच एकता शोधायची.
Wednesday, August 29, 2007
श्रावण कृष्णपक्षारंभ
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment