Wednesday, August 15, 2007

बुधपूजन

दिनमाहात्म्यः बुधपूजन
[ Wednesday, August 15, 2007 04:22:18 am]

बुधपूजन
श्रावण महिन्यात दर बुधवारी बुधपूजन करण्याची प्रथा आहे. बुध हा चंद आणि रोहिणी तारा यांचा पुत्र आहे. म्हणून बुधाला रौहिणेय हे नाव मिळालं. बुधासंबंधी आणखी एक वैदिक कथा सांगितली जाते. कश्यपाला धनु नावाची पत्नी आणि रज नावाचा पुत्र होता. वरूणाने रजला आपली कन्या वारूणी दिली. अचानक वारूणी पाण्यात बुडाली. तिच्या शोधासाठी चंद पाण्यात उतरला. पाण्यातून सुंदर बालक वर आले. हाच बुध होय. गुरूपत्नीने त्याला सांभाळले आणि दाक्षायणीच्या हवाली केले. बुधाला पुरूरवा नावाचा पुत्र झाला. तोच सोमवंशाचा मूळ पुरूष. बुध हा सूर्यमालेतील पहिला ग्रह आहे. श्रावणातील बुधवारी बुधाची बालमूतीर् काढून तिची पूजा करतात.

- दा.कृ.सोमण

No comments: