आज श्रावणातली दुसरी मंगळागौर. पूवीर् विशिष्ट महिलाच मंगळागौरीची पूजा करत असे. पण सर्वच महिलांनी मंगळागौरीची पूजा करायला पाहिजे. कारण त्यानिमित्ताने एकत्र येण्याची संधी मिळत असते. दैनंदिन रहाटगाडग्यातून विश्रांती मिळते. मंगळागौरीची पूजा ही शक्तीची उपासना आहे. एकत्र येण्याने ही शक्ती जागृत होते.
इस बाई इस दोडका किस,
दोडक्याची फोड लागते गोड.
आणिक तोड बाई आणिक तोड
मंगळागौर जागवताना म्हणायची अशा प्रकारची गाणी दु:ख विसरायला लावतात. म्हणतात ना, दु:ख वाटलं तर कमी होतं आणि सुख वाटलं तर ते वाढतं. पूजा करताना वाहिलेली जाई, जुई, शेवंती, मोगरा, नागचाफा, गुलाब, जास्वंद ही फुले मनाला प्रसन्नता प्राप्त करून देतात. आघाडा, तुळस, कण्हेर, रूई, डाळिंब, अशोक यामुळे निसर्गाशी जवळीक साधली जाते.
- दा.कृ. सोमण
Tuesday, August 21, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment