Wednesday, August 22, 2007

बुधपूजन

आज बुधपूजन करण्याचा दिवस. वैज्ञानिकदृष्ट्या पाहिलं तर बुध हा सूर्यमालेतील पहिला ग्रह आहे. श्रावणातील बुधवारी बुधाची बालमूतीर् काढून तिची पूजा करतात. दहीभाताचा नैवेद्य दाखवतात. बुधपूजनाने धन, वैभव आणि बुध्दींमत्ता प्राप्त होते. तसेच आज शुक्लपक्षातील अष्टमी म्हणजेच दुर्गाष्टमी आहे.

वारांना नावे कशी मिळाली हेही मनोरंजक आहे. होरा हा शब्द कालवाचक म्हणून वापराला जातो. २४ तासामध्ये २४ होरा असतात. भूमध्य पद्धतीप्रमाणे मंदगती ते शीघ्रगती अशी ग्रह आणि चंद सूर्याची नावे दिली जातात. शनी हा सर्वात मंदगतीने भ्रमण करणारा ग्रह म्हणून त्याचे नाव प्रथम लिहिले जाते. शनी, गुरू, मंगळ, सूर्य ही नावे क्रमाने २४ पर्यंत लिहिली म्हणजेच २४ होरे झाले की २५वे नाव पुढील वाराचे येते. अशाप्रकारे सात वारांना नावे मिळाली आहेत.

- दा. कृ. सोमण

No comments: