Monday, August 20, 2007

शिवामूठ

शिवामूठ म्हणजे शंकराला श्रावणातल्या सोमवारी वाहायची धान्याची मूठ. अर्थात ही मूठ वाहताना शंभोशंकराची गंध, फूल,
बेलाची पाने हे ही वाहून पूजा करतातच. शिवामुठीचे प्रत्येक सोमवारचे धान्य निराळे असते. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग, चौथ्या सोमवारी जव वाहतात. एखाद्या श्रावणात पाचवा सोमवार आला तर त्या सोमवारी सातूची मूठ वाहतात. या व्रताने शंकर प्रसन्न होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
- अक्षरदास

No comments: