Sunday, August 19, 2007

आदित्यराणूबाई

श्रावणातल्या दर रविवारी मौन धारण करून, सचैल (कपडे घालून) स्नान करून सूर्यदेवाची करावयाची ही पूजा म्हणजे आदित्यराणूबाईचे व्रत. रविवारी नागवेलीच्या (म्हणजे विड्याच्या) पानावर रक्तचंदनाने सूर्याचे आणि त्याच्या आईचे म्हणजे राणूबाईच्या चित्राचे रेखाटन करतात. त्याला पानफूल वाहून पूजा करतात. तसे सूर्यदेवाला गूळ-खोबऱ्याचा नैवेद्य दाखवतात. सूर्यासारखे तेज मिळण्यासाठी करावयाचे हे व्रत काही भक्त श्रावणात सुरू करतात आणि त्याचे उद्यापन थेट सहा महिन्यांनी रथसप्तमीला करतात.

- अक्षरदास

No comments: