Saturday, August 18, 2007

संपत् शनिवार

श्रावणात शनिवारी शनिदेवांची करावयाची पूजा म्हणजे संपत् शनिवारचे व्रत. या दिवशी येणाऱ्या याचकाला विन्मुख पाठवले जात नाही. कारण शनिदेव स्वत: याचकाचे रूप घेऊन भक्ताच्या दारात उभे राहतात, अशी श्रद्धा आहे. या दिवशी काही भक्त भाकरी व केनीकुर्डूची भाजी करतात. तसेच, शनिदेवांना प्रिय असणाऱ्या वस्तूंचा नैवेद्य दाखवून त्यांचे स्तवन केले जाते.

- अक्षरदास

No comments: