Tuesday, August 14, 2007

मंगळागौर

दिनमाहात्म्य : मंगळागौर

[ Monday, August 13, 2007 07:46:34 pm]

जयदेवी मंगळागौरी, ओवाळीन सोनिया ताटी।
रत्नांचे दिवे, माणिकांच्या वाती, हिरेया मोती ज्योती।।

आज श्रावणातला पहिला मंगळवार, नवविवाहीत महिलांसाठी मंगळागौरीची पूजा हे खास आकर्षण, या व्रतामागील उद्देश गृहसौख्यप्राप्ती असला तरी महिलांना आनंदप्राप्तीचं फल मात्र लगेचच प्राप्त होतं असतं. विवाहानंतर पहिली पाचवर्षे श्रावणातल्या मंगळवारी हे व्रत करायचं असतं.

या दिवशी सकाळी मंगळागौरीची पूजा, आरती केली जाते. दुपारी पुरण वरणाचा नैवेद्य असतो. संध्याकाळी हळदी कंुकू समारंभाच्या निमित्ताने आप्तेष्ट आणि मैत्रिणी एकत्र येऊन गप्पा गोष्टी करतात. रात्रीच्या जेवणाचा मेनूही खास ठरलेला असतो. त्यामध्ये उसळ, मसाले भात, भाजणीचे वडे, दही, शिरा, पोळी आदी पदार्थांचा समावेश असतो. या दिवशी फुगड्या, झिम्मा, पिंगा, कोंबडा आणि गोफ या खेळांनी रात्र जागवण्याचा प्रघात आहे.

- दा. कृ. सोमण



No comments: