Thursday, August 16, 2007

विनायक चतुर्थी

प्रत्येक चांद महिन्यात विनायक चतुर्थी येत असते। पण श्रावण महिन्यातील विनायक चतुर्थीचे महत्त्व अधिक आहे। आज श्रावण महिन्यातील विनायक चतुर्थी आहे. सर्वतोभद मंडलावर श्रीगणेशाची स्थापना करून त्याची षोडषोपचारे पूजा करायची असते. श्रीगणेशास सोन्याची दुर्वा, बेल, आघाडा, शमी आणि मंदार वहावे. आज नाग चतुथीर्चा उपवासही करायचा असतो. तसेच बृहस्पतीची पूजा करण्याचाही प्रघात आहे, बृहस्पती म्हणजे गुरू ग्रह. कागदावर गुरूची बालमूतीर् काढून पूजा केली जाते. त्याला दहीभाताचा नैवेद्य दाखवला जातो.
- दा.कृ.सोमण

No comments: